पोलिस निरीक्षकांच्या "जम्बो' बदल्या?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

नागपूर : शहरातील काही वादग्रस्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होणार असून नव्या दमाच्या पोलिस अधिकाऱ्यांना ठाणेदार म्हणून संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शहर पोलिस दलात दोनच दिवसांपूर्वी फक्‍त तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच काहींनी "थोडक्‍यात बचावलो' अशी भावना व्यक्‍त केली होती. मात्र, येत्या आठवडाभरात शहर पोलिस दलात वरिष्ठ पातळीवर मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत शहरातील अनेक ठाण्यांतील कारभार वादग्रस्त राहिला आहे.

नागपूर : शहरातील काही वादग्रस्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होणार असून नव्या दमाच्या पोलिस अधिकाऱ्यांना ठाणेदार म्हणून संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शहर पोलिस दलात दोनच दिवसांपूर्वी फक्‍त तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच काहींनी "थोडक्‍यात बचावलो' अशी भावना व्यक्‍त केली होती. मात्र, येत्या आठवडाभरात शहर पोलिस दलात वरिष्ठ पातळीवर मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत शहरातील अनेक ठाण्यांतील कारभार वादग्रस्त राहिला आहे. काही ठाणेदारांची कारकीर्द चांगलीच गाजली आहे. पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधून आरोपी पळून जाणे तसेच महिला संदर्भातील गुन्ह्यात आरोपीला सोडून नोकराला आरोपी करण्याइतपत मजल ठाणेदारांनी मारली होती. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्यामार्फत चौकशी करून काही ठाणेदारांचे डिफॉल्ट रिपोर्टसुद्धा पाठविण्यात आले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांमुळे तुर्तास कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, आता बंदोबस्त संपला असून येत्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीपूर्वीच काही ठाणेदारांची बदली होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शहर पोलिस दलातील काही पोलिस निरीक्षकांचा कार्यकाल संपला आहे. तरीही ते पोलिस अधिकारी पदाला चिटकून आहेत. त्यांच्यावर "वरदहस्त' असल्यामुळे त्यांची बदली होत नसल्याची चर्चा पोलिस ठाणेदारांमध्ये आहेत. बरेच पोलिस निरीक्षक एसबी, कंट्रोल रूम आणि साइड ब्रॅंचला आहेत. परंतु, आता त्यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector's "Jumbo" Transfer?