अन्‌ संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल 

rss
rss

नागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले त्यांनी मुख्यालयाकडे धाव घेतली. मात्र पोलिसांचे मॉकड्रिल असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. संघ मुख्यालयावर 2005 साली पहाटे चार वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. या घटनेच्या आठवणी यानिमित्ताने पुन्हा ताज्या झाल्या होत्या. 

महाल येथील रा. स्व. संघाच्या मुख्यालयावर मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे विशेष कमांडो पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कमांडोच्या पथकाने संपूर्ण परिसराला घेरून टाकले. आजूबाजूला असलेल्या इमारतीवर पोलिस चढले. रस्त्यावर लोखंडी कठडे लावून संघ मुख्यालयाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले. संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्यांना रस्त्यावरच अडविण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाहून प्रत्येक जण पेचात पडला होता. झाले तरी काय? असा प्रश्‍न एकमेकांना विचारत होते. कुणालाही काहीच समजत नव्हते.

लोकांनी पोलिसांना विचारणा केल्यास आम्हाला माहीत नाही, एवढेच ते बोलत होते. संघ मुख्यालयाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या, बॉम्बशोधक व नाशक पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com