esakal | बाळापूर शहराची सुरक्षा होणार आता अधिक कडक, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांनो व्हा सावधान
sakal

बोलून बातमी शोधा

police mitra.jpg

दोन महिन्यापासून चालू असलेल्या कोरोना लॉकडाउन दरम्यान, नागरिकांच्या बेफिकीरीने वैतागलेल्या बंदोबस्तावरील पोलिसांना बुधवारी (ता.27) पासून 25 अधिकृत पोलिस मित्रांची साथ मिळाल्याने बाळापूर शहरातील नाकाबंदी आणखी कडेकोट होणार असून, बाळापूर पोलिस ठाण्यातील तोकडी संख्या असलेल्या पोलिसांचा तान देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

बाळापूर शहराची सुरक्षा होणार आता अधिक कडक, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांनो व्हा सावधान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : दोन महिन्यापासून चालू असलेल्या कोरोना लॉकडाउन दरम्यान, नागरिकांच्या बेफिकीरीने वैतागलेल्या बंदोबस्तावरील पोलिसांना बुधवारी (ता.27) पासून 25 अधिकृत पोलिस मित्रांची साथ मिळाल्याने बाळापूर शहरातील नाकाबंदी आणखी कडेकोट होणार असून, बाळापूर पोलिस ठाण्यातील तोकडी संख्या असलेल्या पोलिसांचा तान देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा- लातूर पोलिस ट्रेनिंग कँम्पमधून आलेला युवक बाधित; या तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रवेश

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना बसणार चपकार
शहराची वाढत जाणारी लोकसंख्या व दोन महिन्यापासून सुरू असलेली टाळेबंदी लक्षात घेता त्या तुललनेत सध्या बाळापूर पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. यावर तोडगा म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके व ठाणेदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘पोलिस मित्र’ ही संकल्पना अधिक व्यापक प्रमाणात राबवून पोलिसांच्या कामामध्ये चांगल्या नागरिकांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरात आतापर्यंत दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मात्र, काही नागरिक जराही भीती न बाळगता नानाविध कारणांखाली विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या बेशिस्तांना जाब विचारताना, आवर घालताना पोलिसांना चांगलाच थकवा आला होता. मात्र, आजपासून सक्रीय झालेल्या 25 पोलिस मित्रांमुळे तो थकवा आता दूर झाला आहे. शहरातील समाजसेवी वृत्तीच्या युवकांची चारित्र्यपडताळणी करून ‘पोलिस मित्र’ बिल्ले देण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने त्यांना ‘सुरक्षा कीट’ देण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. यापुढे लॉकडाऊन असेपर्यंत ‘पोलिस मित्रांच्या’ माध्यमातून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक नितीन शिंदे म्हणाले.

क्लिक करा- उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी, या जिल्ह्याचा पारा 47 अंशाच्या पुढे

दादा, भाऊ पासून होणारा त्रास थांबला
संपूर्ण टाळेबंदीच्या काळातही दादा, भाऊंचे फिरणे कमी होताना दिसत नव्हते. पोलिस कर्मचारी ओळखीचे असल्याने या भाऊ दादांना कोणी अडवीत नव्हते. मात्र पोलिसांनी शहरात केलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिस मित्रांची नेमणूक केल्याने पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील ताण हलका झाला असून, स्थानिक ‘भाऊ, दादा’ यांचा त्रास थांबला आहे. विशेष म्हणजे नागरिक व पोलिसांमध्ये होणारे वादही कमी होत आहेत.