लाच मागणारा अकोल्याचा फौजदार एसीबीच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

अमरावती : दारूबंदीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजार रुपये व जुनी गाडी जप्तीत दाखविण्यासाठी पाच हजार रुपये, अशी 20 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अकोला येथील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी (ता. 26) ताब्यात घेतले. दीपक मारोती सोळंके (वय 32), असे ताब्यात घेण्यात आलेल्या फौजदाराचे नाव आहे. ही घटना 20 ऑगस्टची आहे. त्यावेळी संबंधित फौजदार मूर्तिजापूर येथे नियुक्त होता. सद्यःस्थितीत तो अकोल्याच्या रामदासपेठ ठाण्यात आहे. सोळंके या फौजदाराने मूर्तिजापूर येथे तक्रारदारास दारूची अवैध वाहतूक करताना पकडून लाचेची मागणी केली होती.

अमरावती : दारूबंदीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजार रुपये व जुनी गाडी जप्तीत दाखविण्यासाठी पाच हजार रुपये, अशी 20 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अकोला येथील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी (ता. 26) ताब्यात घेतले. दीपक मारोती सोळंके (वय 32), असे ताब्यात घेण्यात आलेल्या फौजदाराचे नाव आहे. ही घटना 20 ऑगस्टची आहे. त्यावेळी संबंधित फौजदार मूर्तिजापूर येथे नियुक्त होता. सद्यःस्थितीत तो अकोल्याच्या रामदासपेठ ठाण्यात आहे. सोळंके या फौजदाराने मूर्तिजापूर येथे तक्रारदारास दारूची अवैध वाहतूक करताना पकडून लाचेची मागणी केली होती. मात्र, रक्कम दोन दिवसांत मोबाईलवरून कॉल केल्यानंतर आणून द्यावी, असे फौजदाराने म्हटले होते. याबाबतच्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 ऑगस्टला खातरजमा केली, तेव्हा फौजदार लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, फौजदारास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. दरम्यान, त्याचे मूर्तिजापूर येथून रामदासपेठ अकोला येथे स्थानांतर झाले. यासंदर्भात लाचलुचपत विभागाने संबंधित फौजदारास गुरुवारी (ता. 26) ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल तसरे यांच्या नेतृत्वातील चमूने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer from akola arrested for accepting bribe