File photo
File photo

पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला

पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला  
नागपूर : पेट्रोल पंपावर लाइन तोडून मध्येच दुचाकी लावल्याने पोलिस कर्मचाऱ्याने युवकाला हटकले. या वादातून युवकाने चार ते पाच आरोपींना बोलावून पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना सोमवारी सकाळी जरीपटक्‍यात घडली. पद्माकर उके असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
उके हे जरीपटका पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्यांची सोमवारी साप्ताहिक सुटी होती. ते सकाळी भाच्याला शाळेत सोडून देण्यासाठी दुचाकीने जात होते. दरम्यान, ते मार्टिननगराजवळील एका पेट्रोल पंपावर गेले होते. लाइनमध्ये उभे असताना आरोपी युवकमध्ये लाइन तोडून पेट्रोल भरण्यासाठी आला. त्यामुळे पद्माकर यांनी त्या युवकाला लाइनमध्ये येण्याचा सल्ला दिला. याच कारणावरून दोघांत वाद झाला. युवकाने पोलिस कर्मचाऱ्याला अश्‍लील शिवीगाळ केली. त्यानंतर पाहून घेण्याची धमकी दिली. आरोपी युवकाने लगेच फोन लावून चार मित्रांना बोलावले. पेट्रोल पंपावर दोन दुचाकींनी चार युवक आले. आरोपींनी उके यांच्यासोबत पुन्हा वाद घालून मारहाण केली. एका आरोपीने उके यांच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र, पद्माकर यांनी वार चुकवीत स्वतःचा जीव वाचवला. मात्र, एक वार त्यांच्या दंडावर लागला. जखमी झाल्यानंतरही उके यांनी दोन-दोन हात केले. मात्र, युवकांनी जबर मारहाण करून पळ काढला. या प्रकरणी उके यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्ही नाही
रात्री उशिरापर्यंत पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा पत्ता लागला नव्हता. ज्या पेट्रोल पंपावर ही घटना घडली, तेथे सीसीटीव्ही लागलेले नव्हते. त्यामुळे आरोपींचे छायाचित्र किंवा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र, जरीपटका पोलिसांचे एक पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com