पोलिस कर्मचाऱ्याचा युवकावर हल्ला!

file photo
file photo

नागपूर : पोलिस मुख्यालयात तैनात कर्मचाऱ्याने साथीदारांच्या मदतीने एका युवकावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास माउंट रोडवरील व्ही फाइव्ह लोकल्स पब येथे घडली. या मारहाणीत शोएब अहमद (29 वय, रा. जागनाथ बुधवारी) याच्या हाताला गंभीर मार लागला आहे. शोएब याच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आदित्य ठाकूर, शुभम शरद जैन व त्याच्या साथीदाराविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. आदित्य हा पोलिस मुख्यालयात तैनात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब याने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री शोएब, त्याचे मित्र फहाद अली, जुनैद शेख व सलमान खान पबमध्ये गेले. यावेळी पोलिस कर्मचारी आदित्य ठाकूर, शुभम व त्याचे साथीदारही तेथे आले. आदित्य याने बॉटलमधील पेय हवेत उडविली. ती शोएब याच्या अंगावर पडली. शोएब याने आदित्यला हटकले. त्यामुळे आदित्य संतापला. आदित्य व त्याच्या साथीदारांनी शोएब याला मारहाण करायला सुरुवात केली. शोएब याच्या मदतीसाठी जुनैद धावला. आदित्यने त्यालाही मारहाण केली. त्यानंतर आदित्य व त्याचे साथीदार तेथून पसार झाले. या मारहाणीदरम्यान आदित्य व त्याच्या साथीदारांनी जुनैद याच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याचा आरोपही शोएब याने केला आहे. मारहाण झाली आहे. आदित्य हा पोलिस मुख्यालयात तैनात आहे. सोनसाखळी हिसकावल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. सीसीटीव्ही फुटेजमध्येही सोनसाखळी हिसकावण्यात आल्याचे दिसत नाही. शोएबच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com