पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंग दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नागपूर - पोलिस अधिकारी ज्योती प्रिया सिंग व पोलिस उपअधीक्षक वैशाली माने यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दाखल केलेला विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव शनिवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दाखल करून घेतला.

नागपूर - पोलिस अधिकारी ज्योती प्रिया सिंग व पोलिस उपअधीक्षक वैशाली माने यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दाखल केलेला विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव शनिवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दाखल करून घेतला.

ज्योती प्रिया सिंग 2013 मध्ये कोल्हापूर येथे पोलिस अधिकारी होत्या. याबाबत बोलताना क्षीरसागर म्हणाले, की खोटे गुन्हे दाखल करून आपली बदनामी केली होती. कोणतेही सबळ कारण नसताना आपली समाजातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे हक्कभंग दाखल करीत असल्याचे ते म्हणाले. या वेळी नितेश राणे यांनीही वर्तमानपत्रांमध्ये आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणतात...
* महिलांवर होणारे 97 टक्के अत्याचार ओळखीच्या व्यक्तींकडून
* राज्यात अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांमध्ये चार टक्‍क्‍यांनी घट
* अत्याचाराच्या प्रलंबित प्रकरणांसाठी 22 जलदगती न्यायालये
* अत्याचाराच्या नव्या प्रकरणांच्या निकालासाठी 27 विशेष न्यायालये
* विनयभंगाच्या आरोपींवर 24 तासांच्या आत दोषारोपपत्र
* मनोधैर्य योजनेचा निधी वाढविण्याचा सरकारचा निर्णय
* पोलिसांसाठी 48 हजार सदनिकांचे नियोजन
* चार हजार सदनिका येत्या वर्षभरात
* पोलिसांनी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्यास सवलती
* केवळ पोलिस भरतीने प्रश्‍न सुटणार नाहीत
* "ई-कंप्लेंट'ची सुविधा पुण्यात सुरू; लवकरच राज्यभरात

"पोलिसांवरील हल्ल्यांसाठी पाच वर्षांची शिक्षा'
सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर पूर्वी कलम 353 व 332अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा व्हायची. मात्र आता ही शिक्षा पाच वर्षांपर्यंत वाढविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सोबतच हा अजामीनपात्र गुन्हा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"शिवानी दाणीचे नाव तक्रारीत नाही'
"मेयोमधील घटनेची तक्रार नोंदविली गेली आहे. या घटनेचे संपूर्ण फुटेज सीडीमध्ये आहे. ते दाखवले तर "दूध का दूध पानी का पानी' होईलच. मात्र तक्रारीत नाव नसतानाही शिवानी दाणी हिचा उल्लेख विरोधकांनी केला. शिवानी दाणी ही युवा मोर्चाची अध्यक्ष आहे. याहीपेक्षा अधिक महत्त्वाची म्हणजे ती देशातील स्टॉक एक्‍स्चेंजची तरुण ट्रेनर आहे,' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Police officers rushed Filed infringement claims