वणीतील कोंबड बाजारावर छापा; नऊ संशयित ताब्यात; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Police raid on hen fight market
Police raid on hen fight market

वणी (जि. यवतमाळ) : शहराला लागून असलेल्या खुल्या मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी (ता.सहा) सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील विठ्ठलवाडी येथे करण्यात आली.

अतुल बोबडे (वय 35, रा. कनकवाडी), खुशाल मोहितकर (वय 33, रा. विठ्ठलवाडी), मंगेश ठेंगणे (वय 33, रा. विठ्ठलवाडी), राहुल फुटाणे (वय 30, रा. शेगाव, जि. चंद्रपूर), बंडू ढेंगडे (रा. वरोरा), सुभाष मोते (वय 29, रा. गणेशपूर), प्रवीण पराते (वय 32, रा. बोर्डा, ता. वरोरा), संकेत ठाकरे (वय 22, रा. विद्यानगरी) अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.

विठ्ठलवाडी येथील मोकळ्या मैदानात कोंबड बाजार सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यावरून हा छापा टाकण्यात आला. घटनास्थळावरून जुगारींसह तब्बल 16 जिवंत कोंबडे ताब्यात घेण्यात आलीत. यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनांसह 22 हजार 130 रुपयांची रोकड असा एकूण सात लाख 37 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, प्रभाकर, सुदर्शन वानोळे, प्रकाश गोरलेवार, सुनील कुंटावार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार,जयार रोगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

रूजू होताच कारवाई

वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून संजय पुज्जलवार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. लगेच दुसऱ्या दिवशी कोंबड बाजारावर छापा टाकल्याने अवैध व्यावसायिकांत धडकी भरली आहे. एसडीपीओ पुज्जलवार यांचा यापूर्वी एलसीबी, एसडीपीओ म्हणून जिल्ह्यात कार्यकाळ गेला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com