तिघांच्या मनसुब्यावर पोलिसांनी फेरले पाणी...सव्वा लाखाचा ऐवज जप्त

तिरोडा : जप्त केलेला मोहापास पोलिस ठाण्यात नेण्यासाठी सज्ज पोलिस.
तिरोडा : जप्त केलेला मोहापास पोलिस ठाण्यात नेण्यासाठी सज्ज पोलिस.

तिरोडा (जि. गोंदिया) : पोलिसांनी काल शनिवारी दुपारी अवैधरीत्या मोहफुलाची दारू गाळणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. यात तीन ठिकाणातून 1 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

25 एप्रिलला सकाळी 11च्या सुमारास तिरोडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल साबळे, राधा लाटे, व इतर कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून संत रविदास वॉर्ड तिरोडा येथील आरोपी कलिम गफुर खॉं पठाण (वय 32) याच्या घरी छापा टाकला. यावेळी आरोपी स्वतःच्या घरी पोलिस आल्याचे पाहून मागच्या दरवाजाने पळून गेला.

पोलिसांनी शेजारील लोकांना त्याचे नाव, गाव विचारून चौकशी करून पंचासमक्ष घराची झडती घेतली. यातून 47 प्लॅस्टिक पिशवीतील प्रत्येकी दहा किलो प्रमाणे 470 किलो सडवा मोहापास रसायन, एक प्लॅस्टिक डबकीत 9 लिटर हातभट्टीची दारू, दारू काढण्याचे संपूर्ण साहित्य पकडून कलम 65 अंतर्गत कारवाई केली.

दोघांच्या घरावर अचानक छापा

त्याचप्रमाणे साबिर खॉं रहिम खॉं पठाण (वय 52, रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा) याच्या घरून 52 प्लास्टिकच्या पिशवीतून 520 किलो सडवा मोहापास एकूण किंमत 52 हजार रुपयांच्या माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे तिसरा आरोपी ईश्वर मदन बरीयेकर (वय 38, रा. संत रविदास वार्ड तिरोडा) याच्या घरीसुद्धा अचानक छापा मारला असता 200 किलो सडवा मोहापास रसायन एकूण 20 हजार रुपये किमतीचा अवैधरित्या माल पकडला.


मोहापास रसायन सडवा केला नष्ट

दारू काढण्यासाठी उपयोगात येणारे सर्व साहित्य ट्रॅक्‍टरने पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. मोहापास रसायन सडवा कोर्टात दाखल करण्याइतका पंचासमक्ष सीलबंद करून बाकी सर्व मोहापास रसायन सडवा घटना ठिकाणी नष्ट करण्यात आला. वरील तिन्ही आरोपी आपल्या घरच्या मागील दरवाजातून पळून गेले, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com