ऑनलाइन जुगारावर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

यवतमाळ : शहरातील दोन ऑनलाइन जुगारावर छापा टाकून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी सात जणांविरुद्घ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई शनिवारी (ता.28) एलसीबीच्या पथकाने केली.

गांधी चौकातील जुगारावर छापा टाकून पोलिसांनी पंकज आगरकर (रा. शिवाजी चौक), राजू मेश्राम (रा. अंबिकानगर) यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख वीस हजार 950 रुपये व जुगार साहित्य असा एकूण 59 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली. तर, नितीन ऑनलाइन लॉटरी सेंटरवर छापा टाकण्यात आला. दिनेश निनावे (शिवाजी चौक), सौरभ आडे (रा. गोदाम फैल), विराज दत्तरवार (रा. चमेडीयानगर), सवरजन मुनेश्‍वर (गिरीजानगर), अजय खोब्रागडे (रा. तलावफैल) यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख 17 हजार 280 व एक लाख 45 हजार रुपये किमतीचे जुगार साहित्य असा एकूण एक लाख 71 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे ऑनलाइन जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid online gambling