नवीन कामठीतील सेक्‍स रॅकेटवर पोलिसांचा छापा

कामठी - युवतींसह पथकप्रमुख एपीआय ओमप्रकाश सोनटक्‍के आणि इतर.
कामठी - युवतींसह पथकप्रमुख एपीआय ओमप्रकाश सोनटक्‍के आणि इतर.

नागपूर - नवीन कामठी परिसरातील हॉटेल रिलॅक्‍स लॉजिंग ॲण्ड बोर्डिंगमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या पथकाने छापा टाकून १५ वर्षांच्या मुलीसह दोघींना ताब्यात घेतले. तर ३ दलालांना अटक केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल रिलॅक्‍स लॉजमध्ये सेक्‍स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्‍के यांना मिळाली. सायंकाळी ५ वाजता एक पंटर लॉजवर पाठविला. आरोपी दलालांशी सौदा पक्का झाल्यानंतर हॉटेलच्या अटेंडंटने एक तरुणी उपलब्ध करून हॉटेलच्या खोलीत पाठविले. जसा पंटरने पोलिसांना इशारा केला, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी २ पीडित तरुणींसह ३ आरोपींना ताब्यात घेतले. यात हॉटेलचा अटेंडंट अभिषेक रमेश पाटील (३१, रा.कोळसा चाल, कामठी), दलाल सय्यद सरफराज अली अय्यद आसिफ अली (२७, रा.इतवारी) आणि तरुणींना पुरविणारा मोंटू बापूराव ठाकूर (३१, रा. नंदनवन) यांना अटक करण्यात आली.

ऑटोत दाखवायचे मुली
पतीपासून विभक्‍त महिला दीपाली आणि साक्षी या दोघींना रिलॅक्‍स लॉजसमोर उभ्या ऑटोत बसविण्यात येत होते. ऑटोतच ग्राहकांना पाठवून पसंती ठरविण्यात येत होती. दलालाला पैसे मिळताच लॉजमध्ये सर्व सुविधांसह आंबटशौकिनांना मौजमौज करण्याची सुविधा देण्यात येत होती.

कमी वयात देहव्यापार
सेक्‍स रॅकेटमध्ये सापडलेली १५ वर्षाची मुलगी साक्षी (बदललेले नाव) वाठोड्यात राहते. वडिलाचे निधन झाले तर वृद्ध आई धुणीभांडी करते. ती आठव्या वर्गाची विद्यार्थिनी असून दोन वेळेसच्या जेवणाची सोय म्हणून तिला वकीलपेठमध्ये राहणाऱ्या दीपालीने देहव्यापारात ओढले.  गरिबीचा फायदा घेत तिचा व्हिडिओ बनवून केवळ दोनशे रुपयांसाठी तिचा वापर दलाल करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com