नोटा कमी पैशांत बदलून देणाऱ्यांवर छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

अकोला - दहा टक्के कमिशनवर पाचशे व हजार रुपयांच्या बंद झालेल्या नोटा बदलून देणाऱ्यांवर सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी दुपारी खाऊगल्ली येथे छापा घातला. दोन ठिकाणी केलेल्या या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम किती आहे, याचा खुलासा पोलिसांनी केला नाही. 

देशात मंगळवारी (ता. 8) रात्रीपासून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झालेल्या आहेत. याचा गैरफायदा घेत अडचणीत सापडलेल्या नागरिकांकडून दहा टक्के कमिशन घेत नोटा बदलून देण्याचा व्यवसायाच काही जणांनी सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशा व्यावसायिकांविरुद्ध बुधवारी दुपारी पोलिसांनी कारवाई करीत रोख रकमेसह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

व्यापाऱ्यांकडे परवाना, पण... 

पैसे बदलून देण्याचा परवाना या व्यापाऱ्यांकडे आहे. परंतु, हा परवाना फाटलेल्या, रंगीत, जीर्ण झालेल्या नोटा बदलून देण्याचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरीही कमी पैशात नोटा बदलण्याचा उद्योग करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Web Title: Police raided at khaugalli

टॅग्स