खामगाव: जुगारावर छापा टाकून 14 जण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

खामगाव : शहरालगत शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीच्या परीसरात जय भारत हॉटेल मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर 24 ऑगस्ट च्या सायंकाळी उशिरा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 14 जुगारी ताब्यात घेण्यात आलेत. त्यांच्या कडून 5  दुचाकी , 7 मोबाईल , रोख व इतर साहित्य असा पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खामगावच्या औद्योगिक वसाहतीच्या परीसरात मोठया प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. दरम्यान आज नव्याने रुजू झालेले डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक  संदीप डोईफोडे, शाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून एका मोठया वरळी माफियाचा हॉटेल च्या आड सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाई मध्ये 14  जुगारी पोलिसांनी पकडले आहेत. संजय श्यामसिंग ठाकूर भगतसिंग चौक, निलेश मदनसिंह दीक्षित फरशी, वसंता किसन चोपडे, सागर सुखदेव कळस्कार, समाधान पांडुरंग कळसकर व शंकर सुपडा दाणे सुटाळाखुर्द, राजेंद्र रामचंद्र सावंग रोहना, शिवाजी अंबादास गायकवाड शिवाजी वेस, कैलास भगवान वाकुडकर घाटपुरी, गजानन वामनराव वांडे टायडे कॉलोनी,मुरलीधर मुकीदा भातखेडे , प्रवीण देविदास बकाल, सुटाळा, संजय तुकाराम धोरण जळगाव जामोद, नारायण सीताराम वाघ खमागाव अशी त्यांची नावे कडून वरळी साहित्य, रोख व दुचाकीसह एक लाख 70 हजार 580 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसात गुन्हे दाखल दाखल करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, सपोनि सुनील अंबुलकर यांच्यासह पोहेकॉ सुधाकर काळे, नापोका गजानन आहेर, संजय नागवे, दीपक पवार, गजानन जाधव , मोहन करूटले, बाळकृष्ण फुंडकर यांनी केली आहे.

Web Title: police raides gambler in Khamgaon