ब्यूटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या युवतीवर पोलिसाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

नागपूर - ब्यूटीपार्लरमध्ये मसाज करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने ब्यूटीपार्लरमधील युवतीवर बलात्कार केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून नागपूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. उज्ज्वल सुरेश ठाकरे (वय 32) असे नराधम पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 29 वर्षीय युवती उच्चशिक्षित असून, नोकरी न मिळाल्यामुळे तिने ब्यूटीपार्लर टाकले. गेल्या पाच वर्षांपूर्वी आरोपी पोलिस कर्मचारी उज्ज्वल ठाकरे हा ब्यूटीपार्लरमध्ये फेस मसाजसाठी आला होता. तेव्हा दोघांची ओळख झाली. तो ब्यूटीपार्लरमध्ये वारंवार मसाजसाठी येऊ लागला. दरम्यान, त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. दोघांची मैत्री झाली. 16 मे 2013 मध्ये तो ब्यूटीपार्लरमध्ये आला. सायंकाळची वेळ असल्यामुळे पार्लरमध्ये कुणीही नव्हते. त्याने मसाज करीत असताना तिच्यावर बलात्कार केला. पोलिसाचा धाक दाखवून त्याने दमदाटी केली. तेव्हापासून तो वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तिने लग्न करण्याचा तगादा लावला तेव्हा आरोपीने तिला टाळणे सुरू केले. याप्रकरणी फिर्यादीने गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

Web Title: police rape on girl crime