पोलिस भरती घोटाळ्याचा तपास एसआयटीकडे ; तिघांना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 28 एप्रिल 2018

जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेत आरोपी असलेल्या आणखी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी एसआयटीकडे दिला आहे. अटक केलेल्या तिघांना चार मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

नांदेड : जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेत आरोपी असलेल्या आणखी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी एसआयटीकडे दिला आहे. अटक केलेल्या तिघांना चार मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

अटक आरोपींची संख्या १५ वर गेली आहे. यातील १२ जणांना तीन मेपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी हा तपास वेगाने फिरवत शुक्रवारी कृष्णा जाधव (रा. सावरखेडभोई ता. देऊळगावराजा), हनुमान भिसाडे (रा. रिसोड जिल्हा वाशिम) आणि रामदास भालेराव (रा. बहाद्दरपूरा, कंधार जिल्हा नांदेड) या तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता चार मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

Web Title: Police Recruitment Scam Investigation Hand Over to SIT

टॅग्स