शेवटच्या दिवशी पोलिस भरतीत 'राडा' ; 200 उमेदवारांचा हिरमोड

अनिल कांबळे
मंगळवार, 27 मार्च 2018

नागपूर शहर पोलिस आयुक्‍तालयातर्फे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी 'राडा' झाला. प्रवेशपत्र दिल्यानंतर आज मंगळवारी शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. 

नागपूर : नागपूर शहर पोलिस आयुक्‍तालयातर्फे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी 'राडा' झाला. प्रवेशपत्र दिल्यानंतर आज मंगळवारी शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. 

मैदानावर पोचल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया एक दिवसापूर्वीच संपल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी धिंगाणा घालत भरती प्रक्रियेस विरोध दर्शविला. त्यामुळे पोलिस मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, याप्रकरणी भरती प्रक्रियेचे पोलिस उपायुक्‍त श्‍वेता खेडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Police Recruitment some confusion there 200 candidate nervous