अखेर, अफरातफरीची पोलिस तक्रार; रकमेसह आरोपी वाढण्याची शक्‍यता 

Police report on Bhiwapur tax collection case
Police report on Bhiwapur tax collection case

भिवापूर, (जि. नागपूर)  :  नगरपंचायतच्या करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याने घोटाळा केलेल्या रकमेचा आकडा 6 लाख 40 हजार रुपयांचा असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली असून घोटाळ्यात नगरपंचायतीचे आणखी काही कर्मचारी गुंतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

घोटाळ्याचे आरोप असलेल्या कन्हैय्या दुधपचारे या कर्मचाऱ्याचा गत 21 नोव्हेंबरला अचानक मृत्यू झाला. नागरिकांकडून करवसुलीचे काम न. पं. ने कन्हैय्याकडे सोपविले होते. त्याच्या मृत्यूपश्‍चात न. पं. मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी नागरिकांकडून वसूल केलेल्या कराचे रेकॉर्ड तपासले. त्यात त्यांना मोठी तफावत दिसून आली. त्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी दखणे यांनी अभियंता पटेल यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. प्रकरणाची चौकशी करून पटेल यांनी गुरुवारला (ता. 5) त्याचा अहवाल सादर केला. 

आणखी काही कर्मचारी गुंतले असल्याची चर्चा

अहवालानुसार वसूल केलेल्या कराच्या एकूण रकमेपैकी 6 लाख 40 हजार रुपये न.पं. कार्यालयाकडे जमा करण्यात आली नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा प्राथमिक अहवाल असून अंतिम चौकशी अफरातफर केलेल्या रकमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. अहवालामुळे न.पं. वर्तुळात बरीच खळबळ माजली आहे. या अफरातफर प्रकरणात कन्हैय्या सोबत आणखी काही कर्मचारी गुंतले असल्याची चर्चा आहे. मुख्याधिकारी दखणे यांनी या प्रकरणाची गुरूवारी उशिरा पोलिसांत तक्रार केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक भस्मे हे पुढील चौकशी करीत आहेत. मृत कन्हैय्या याला जुगार खेळण्याचा छंद होता. कराची रकम त्याने जुगारात उडवली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

6 लाख 40 हजार रुपयांचा घोळ

मुख्याधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 लाख 40 हजार रुपयांचा घोळ आहे. कन्हैय्या दुधपचारे व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहेत का? या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. 
- महेश भोरटेकर, ठाणेदार, भिवापूर. 

आकड्यात वाढ होण्याची शक्‍यता

अफरातफर कन्हैय्या दुधपचारे याच्या मृत्यूपूर्वीच्या एक महिन्याच्या कालावधीत केली गेली आहे. प्राथमिक चौकशीत अफरातफरीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
- सुवर्णा दखणे, मुख्याधिकारी, भिवापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com