esakal | साकोली-लाखनीत पोलिसांचा रूटमार्च नेमका कशासाठी?
sakal

बोलून बातमी शोधा

police march

पोलिस स्टेशनपासून ते तहसील कार्यालयापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी कोरोना विषाणूची साथ असल्याने माक्‍स, सॅनिटायझर वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच विनाकारण घराबाहेर पडणारे मास्क न लावणारे यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल, अश सूचना करण्यात आल्या.

साकोली-लाखनीत पोलिसांचा रूटमार्च नेमका कशासाठी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


साकोली/लाखनी( जि. भंडारा) : कोरानाची आरोग्य आणीबाणी, लॉकडाऊनमुळे बंद असलेले सगळे व्यवहार यामुळे समाजमनात एकप्रकारचा तणाव असतानाच पोलिसांनी गावातून मार्च काढला आणि नेमके काय झाले, याविषयी गावात आणि नागरिकांमध्ये भीतीमिश्रित उत्सुकता निर्माण झाली.

काही काळानंतर लक्षात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने साकोली व लाखनी येथे पोलिसांनी रूटमार्च काढला. यावेळी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

लाखनी पोलिस, तहसील कार्यालय, पंचायत समिती व नगरपंचायतीतर्फे शहरात रूट मार्च काढण्यात आला. यावेळी तहसीलदार मल्लिक विराणी, ठाणेदार दामदेव मंडलवार, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सहायक पोलिस निरीक्षक संजय कोरचे आदी उपस्थित होते.

पोलिस स्टेशनपासून ते तहसील कार्यालयापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी कोरोना विषाणूची साथ असल्याने माक्‍स, सॅनिटायझर वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच विनाकारण घराबाहेर पडणारे मास्क न लावणारे यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल, अशही सूचना करण्यात आल्या.

कोविड-19 कोरोना संक्रमणाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जनतेत सुरक्षात्मक उपाययोजना व दक्षतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी साकोली पोलिस व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने शहरात बुधवारी(ता.17) रूटमार्च काढण्यात आला.
रूटमार्चमधे सामाजिक दुरावा, बाजारपेठेत सुरक्षित अंतर, घराबाहेर पडताना मास्कचा वापर, गर्दी टाळावी, बाहेरगावाहून आलेल्यांनी सूचना द्यावी, नियमांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

सविस्तर वाचा - नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळणार?
रुटमार्चमध्ये तहसीलदार बाळासाहेब तेढे, पोलिस निरीक्षक मनोज सिडाम, न. प. मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष जगन उईके, नगरसेवक ऍड. दिलीप कातोरे, मीना लांजेवार, अनिता पोगळे, नगरपरिषद सदस्य, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व प्रतष्ठित नागरिक सहभागी झाले होते.

loading image