पोलिस उपनिरीक्षकाने केली शारीरिक संबंधाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

नागपूर : अजनी पोलिस ठाण्यातील वादग्रस्त कारकीर्द असलेले पोलिस उपनिरीक्षक एस. एस. टेमगिरे याने एका हत्याकांडात जखमी झालेल्या तक्रारदाराच्या तरुण बहिणीला व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील फोटो पाठवून चित्रपट पाहण्यासाठी तगादा लावला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी पीएसआयविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मात्र मलिन झाली आहे.

21 मे रोजी अजनीत धोबी मोहल्ल्यात आशुतोष या युवकाचा पाच ते सहा आरोपींनी कट रचून तलवार-गुप्तीने भोसकून खून केला होता. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी युवकाने अजनी ठाण्यात तक्रार दिली होती. या हत्याकांडात पोलिस उपनिरीक्षक संजय टेमगिरे हा तपास अधिकारी होता. त्यामुळे जखमी युवकाचे बयाण घेण्यासाठी तो घरी आला. त्यावेळी त्या युवकाची 25 वर्षीय बहीण नंदिता (बदललेले नाव) हिच्यावर त्याची नजर पडली. त्यामुळे तपास करण्याच्या बहाण्याने तो वारंवार घरी येत होता. नंदिताला वारंवार पोलिस ठाण्यात बोलवीत होता. पीएसआय टेमगिरेची वाईट नजर असल्याची कल्पना नंदिताला आली. मात्र, वर्दीतील अधिकाऱ्याच्या विरोधात कोण दखल घेणार? म्हणून ती गप्प बसली. 27 ते 31 जूनपर्यंत टेमगिरेने तिला भावाचे कपडे घेऊन पोलिस ठाण्यात बोलावले. तिला रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवून अश्‍लील शब्दात संवाद साधणे सुरू केले. तसेच चित्रपट पाहण्यासाठी टॉकिजमध्ये येण्यासाठी वारंवार विचारू लागला. 13 जूनला सकाळी अकरा वाजता पीएसआय टेमगिरेने चित्रपटाचे तिकीट नंदिताच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले. त्यानंतर तिला तगादा लावला. मात्र, तिने त्याचा प्रस्ताव धुडकावल्याचे पोलिसांनी सांगितले. यात पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.
रक्षकच बनले भक्षक
वर्दीतील पोलिस कर्मचारी असल्यावर नागरिकांमध्ये सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. मात्र, नागपूर शहर पोलिस दलातील काही रक्षकच भक्षक बनले आहेत. एका युवतीला शारीरिक संबधांची मागणी पीएसआय टेमगिरेने केली. असहाय युवतीला वर्दीचा धाक दाखवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police sub-inspector asked for physical relations