नव्या बाटलीत जुनीच दारू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नागपूर - शहर पोलिस दलात पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा वानवा असल्यामुळे ठाणेदारांच्या अंतर्गत बदल्यांमध्ये फारसा बदल दिसून आला नाही. त्यामुळे ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ अशाप्रकारे ठाणेदारांच्या बदल्यांची खिल्ली उडविल्या जात आहे. यासोबतच काही ठाणेदारांवर पोलिस आयुक्‍तांनी मेहरबानी दाखविल्याची चर्चा शहर पोलिस दलात आहे.

नागपूर - शहर पोलिस दलात पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा वानवा असल्यामुळे ठाणेदारांच्या अंतर्गत बदल्यांमध्ये फारसा बदल दिसून आला नाही. त्यामुळे ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ अशाप्रकारे ठाणेदारांच्या बदल्यांची खिल्ली उडविल्या जात आहे. यासोबतच काही ठाणेदारांवर पोलिस आयुक्‍तांनी मेहरबानी दाखविल्याची चर्चा शहर पोलिस दलात आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच राज्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये नागपूर पोलिस दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्या. त्यामुळे धंतोलीचे राजन माने, अविनाश शिळीमकर, पंडित सोनवणे, अनिल कातकाडे, बाजीराव पोवार, सुधाकर ढोणे, सुरेश मदने, गुलफरोज मुजावर आणि बजरंग साळुंखे यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या 

जबाबदाऱ्या होत्या. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या रिक्‍त पदावर ठाणेदार नियुक्‍तीसाठी शहर पोलिस दलात योग्य ते चेहरे नसल्यामुळे आयुक्‍तांना ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ भरण्याचे काम करावे लागले. सर्वांत ज्येष्ठ सुनील बोंडे, सत्यवान माने, जयेश भांडारकर, उत्तम मुळक यांची ठाणेदारी कायम ठेवून त्यांना केवळ दुसरे पोलिस ठाणे देण्यात आले.

यांना पहिल्यांदाच ठाणेदारी
जुनी कामठीचे द्वितीय पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांना नागपूर शहर दलात पहिल्यांदाच ठाणेदारी दिली आहे. त्यांच्याकडे यशोधरानगर ठाण्याची जबाबदारी दिली. तीन महिन्यांपूर्वी लाच देणाऱ्या ठेकेदाराला त्यांनी एसीबीच्या जाळ्यात अडकवले होते, हे विशेष. सतीश गोराडे यांनी आतापर्यंत दुय्यम निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांना पहिल्यांदाच कोराडीचा पदभार देण्यात आला. नरेश पवार यांना हुडकेश्‍वरमध्ये काही दिवसांसाठी पदभार देण्यात आला होता. आता त्यांना वाडीची जबाबदारी दिली. जरीपटक्‍याचे दुय्यम एम. डी. शेख यांना नवीन कामठी, ललित वर्टीकर यांना धंतोली, रमाकांत दुर्गे यांना इमामवाडा आणि वैभव जाधव यांना तहसीलची जबाबदारी दिली.

यांच्यावर आयुक्‍तांचा विश्‍वास
शहरातील काही ठाणेदारांवर पोलिस आयुक्‍तांनी विश्‍वास ठेवला. त्यामध्ये अजनीचे शैलेश संख्ये, पाचपावलीचे नरेंद्र हिवरे, सीताबर्डीचे सत्यवीर बंडीवार, नंदनवनचे माणिक नलावडे, गणेशपेठचे महेश चव्हाण, हुडकेश्‍वरचे सुनील झावरे, कोतवालीचे खुशाल तिजारे, सोनेगावचे संजय पांडे, बजाजनगरचे सुधीर नंदनवार, प्रतापनगरचे शिवाजी गायकवाड, शांतीनगरचे किशोर नगराळे, एमआयडीसीचे सुनील महाडिक, सक्‍करदऱ्याचे आनंद नेर्लेकर, मानकापूरचे पुंडलिक भटकर, गिट्टीखदानचे राजेंद्र निकम, हिंगण्याचे हेमंत खराबे यांची ठाणेदारी कायम ठेवून ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या बदल्यांच्या यादीमध्ये ठाणेदारांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फारसा बदल करण्यात आला नसल्याने कामात संथगती राहणार आहे.

Web Title: Police transfer issue