पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर: पोलिस कर्मचाऱ्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री पोलिस लाइन टाकळी भागात घडली. या प्रकरणात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा समावेश असल्याचीही माहिती आहे. परंतु, पोलिसांकडून आरोपींसंबंधात माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात आली.

अनिल चक्रे असे जखमीचे नाव असून ते पोलिस मुख्यालयात हेडकॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री ड्यूटी आटोपून ते घरी जात होते. पोलिस लाइन टाकळी परिसरातून जात असताना प्रफुल्ल राठोड व त्यांचे मित्र बोलत उभे असल्याचे दिसले. त्यांना बघून चक्रेसुद्धा तिथे थांबून चर्चेत सहभागी झाले. थोड्याच अंतरावर आरोपी युवकांकडून गैरवर्तणूक सुरू होती. चक्रे त्यांनी तिथे जाऊन त्यांना हटकले. दोघांनी त्यांच्यासोबत वाद घालत त्यांना मारहाण केली. राठोड मदतीसाठी धावले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली आणि मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यामागे धावले. यानंतर आरोपींनी चक्रे यांना पुन्हा मारहाण केली. ते खाली पडले असता आरोपींनी त्यांच्या अंगावरून मोटारसायकल नेली. यानंतर ते पसार झाले. घटनेत जखमी झालेल्या चक्रे यांनी गिट्‌टीखदान पोलिसांना घटनेची माहिती दिली. लागलीच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी रविनगरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवित तीन आरोपींना अटक केली. तिघेही सुरक्षा मंडळात कार्यरत असल्याची माहिती असून त्यातील एक पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते. पोलिसांना विचारणा करूनही या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर देण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On a policeman Assault