बंदुकीतून गोळी सुटली, पोलिस थोडक्यात बचावले

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

चंद्रपूर जिल्हा पोलिस मुख्यालयात परेडची तयारी सुरु होती. यावेळी पुरुषोत्तम येरणे हे एसएलआर या बनावटीच्या बंदुकीची सङ्काई करित होते. सहसा या बंदुकीत गोळी नसते. मात्र, या बंदुकीत ती चुकून राहून गेली

चंद्रपूर - परेडकरिता तयारीसाठी बंदुक साफ करताना अचानक पोलिस कर्मचाऱयांच्या हातून ट्रिगर दबला आणि गोळी सुटली. यात दोन पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावले. मात्र, यापैकी एकाच्या बोटाला तर दुसऱ्याच्या गालाला इजा झाली. पुरुषोत्तम येरणे आणि शंकर चौधरी असे जखमी पोलिस कर्मचाऱयांची नावे आहेत.

चंद्रपूर जिल्हा पोलिस मुख्यालयात परेडची तयारी सुरु होती. यावेळी पुरुषोत्तम येरणे हे एसएलआर या बनावटीच्या बंदुकीची सङ्काई करित होते. सहसा या बंदुकीत गोळी नसते. मात्र, या बंदुकीत ती चुकून राहून गेली. अशातच ट्रिगर दबल्यामुळे गोळी सुटली आणि सुदैवाने दोघे पोलिस किरकोळ जखमी झाले. दोघांनाही चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: policeman narrowly escape accidental firing