राजकीय घडामोडीत कार्यकर्त्यांच्या कोलांटउड्या 

Bhandara Election
Bhandara Election

भंडारा : जिल्ह्यातील चार नगर परिषदांमध्ये येत्या 18 डिसेंबरला सार्वजनिक निवडणूक घेण्यात येत आहे. आज, शुक्रवारी नामांकन अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारण्यात आल्या. उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन व पक्षश्रेष्ठींची मनधरणी करत इच्छुकांनी उकच गर्दी केली होती.

जिल्ह्यातील भंडारा, तुमसर पवनी आणि नवनिर्मित साकोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 18 डिसेंबरला होणार आहे. या वेळी नगराध्यक्षांची निवड मतदारांकडून होणार आहे. त्याकरिता शुक्रवारपर्यंत नामांकन अर्ज भरण्यात आले. राजकीय पक्षातून नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. मात्र, प्रत्येक पक्षाकडे दोन ते तिघांकडून उमेदवारीसाठी मागणी झाली. त्यामुळे सर्वांत सरस कोण राहील याचा विचार करून पक्षनेत्यांनी नगर परिषदेत अधिक जागा जिंकण्याच्या उद्देशाने उमेदवारांची निवड केली. भाजपमधून सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली तर, राकॉंतून भगवान बावनकर यांना उमेदवारी मिळाली आहे. पवनी येथे भाजपचे शिल्पा हरीश तलमले यांना उमेदवारी मिळाली. तुमसर येथे भाजपचे प्रदीप पडोळे, राकॉंचे अभिषेक कारेमोरे आणि कॉंग्रेसचे अरविंद कारेमोरे रिंगणात आहेत. 

ठरलेले उमेदवार बदलले 
या सार्वजकि निवडणुकीत दुसऱ्या पक्षासोबत टक्कर देण्यासाठी राजकीय पक्षांनी आधीपासून त्यांचे उमेदवार निश्‍चित केले होते. परंतु, असंतुष्टांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे अनेक पक्षाचे उमेदवार बदलले आहेत. शिवसेना व कॉंग्रेसचा उमेदवार बदलल्याची चर्चा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली सुरू असल्याने वेळेवर उमेदवार ठरविण्यात आले. हीच परिस्थिती पवनी, साकोली व तुमसर येथेही सुरू आहे. ज्यांचा पक्षांकडे निभाव लागला नाही त्यांनी अपक्ष म्हणून नामांकन भरले आहेत. 

कार्यकर्ते इकडून तिकडे 
अनेक वर्षांपासून निष्ठावंत कार्य करणारे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्याने दुखावले गेले. त्यामुळे काहींनी जुना पक्ष सोडून उमेदवारी मिळण्यासाठी अन्य पक्षात प्रवेश केला. या घटनांमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे सूर्यकांत इलमे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी उपाध्यक्ष रुबी चड्डा राकॉं सोडून भाजपचे आले. त्यांच्यासोबत बरेच सहकारी आहेत. राकॉंमधील असंतुष्ट धनराज साठवणे यांना कॉंग्रेसकडून नगराध्यक्षासाठी उमेदवारी देण्यात आली. याचप्रमाणे नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष म्हणून रिंगणात उभे राहण्यासाठी नामांकन भरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com