महापर्दाफाशमधून राजकीय "गेम'

File photo
File photo

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर म्हणून कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (ता.26) अमरावतीत आयोजित महापर्दाफाश सभेच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची अनेक गणिते बसविण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची घेतलेली भेट, प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी आरपीआय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी केलेली चर्चा तसेच माजी आमदार व अमरावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे प्रमुख दावेदार रावसाहेब शेखावत यांनी या मेळाव्याकडे फिरविलेली पाठ यामुळे कॉंग्रेसची महापर्दाफाश सभा चांगलीच चर्चेत राहिली.
सोमवारी सकाळीच आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी विश्रामगृहावर जाऊन कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र ही भेट राजकारणापलीकडील असल्याचा दावा दोघांनीही केला आहे. सुनील देशमुख यांच्याशी चर्चेदरम्यान राजकीय चर्चा झाली नसल्याचे बाळासाहेब थोरात सांगत आहेत. दुसरीकडे बाळासाहेब थोरात, आमदार प्रा. वीरेंद्र जगताप तसेच आमदार यशोमती ठाकूर यांनी आरपीआयचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या निवासस्थानी जावून आघाडीबाबत चर्चा केली. चर्चेदरम्यान गवई गटाकडून विधानसभेसाठी आठ ते दहा जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.

आयोजनाचे कौतुक
अतिशय अल्पकालावधीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप यांनी महापर्दाफाश सभेच्या केलेल्या नियोजनाबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी खासदार नाना पटोले, माजी मंत्री नितीन राऊत आदींनी दोघांचेही कौतुक केले. माणिकराव ठाकरे यांनी जिल्ह्यातील आठही मदतदारसंघात कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा संदेशसुद्दा याच मेळाव्यात दिल्याने खऱ्या अर्थाने हा मेळावा गेम चेन्जर ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com