उमेदवारांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मध्यरात्री भाजप, कॉंग्रेसची नावे निश्‍चित - उमेदवारांना थेट एबी फॉर्म

मध्यरात्री भाजप, कॉंग्रेसची नावे निश्‍चित - उमेदवारांना थेट एबी फॉर्म
नागपूर - बंडखोरी रोखण्यासोबतच इच्छुकांच्या रोषाला आटोक्‍यात ठेवण्यासाठी भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेसह सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या नावांचे लिफाफे बंद करून ठेवले आहेत. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्याच थेट एबीफॉर्म उमेदवारांच्या हाती दिले जाणार आहे. यामुळे सर्वच इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

तीन दिवसांपासून कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाची मुंबईत बैठक सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश प्रभारी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित असतानाही रात्री उशिरापर्यंत कॉंग्रेसच्या यादीला अंतिम मान्यता मिळाली नव्हती. आपल्या खंद्या समर्थकांसाठी नेते अडून बसले आहेत. यामुळे यादीच जाहीर न करता उद्या शुक्रवारी थेट एबीफॉर्म दिला जाणार असल्याचे कळते.

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने नेत्यांना रोष ओढवून घ्यायचा नाही. याकरिता गुरुवारी रात्रीपासून बैठकांच्या फैरी सुरू आहे.

बुधवारी रामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक घेतली. गुरुवारी सकाळी 11 वाजतापासून पुन्हा वाड्यावर बैठक घेण्यात आली. प्रभागनिहाय उमेदवारांशी चर्चा केली.

याही बैठकीला मुख्यमंत्री, गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके यांच्यासह सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे चार वाजताच्या सुमारास बैठक आटोपली. यानंतर पुन्हा रात्री सात वाजतापासून बैठक सुरू झाली. ती मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबीफॉर्म देण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.

कॉंग्रेसचे उमेदवार
विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, दीपक कापसे, किशोर गजभिये, अरुण डवरे, सुजाता कोंबाडे, गार्गी चोपडा, सुरेश जग्यासी, शीला तराळे, किशोर डोरले, श्रावण खापेकर, संदीप सहारे, देवा उसरे, रेखा बाराहाते, दीपक पटेल, बब्बी बावा, राजू थूल, तानाजी वनवे, निमिषा शिर्के, नयना झाडे, वासुदेव ढोके.

भाजपचे उमेदवार
महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, स्थायी समितीचे माजी संदीप जोशी, अविनाश ठाकरे, उपमहापौर सतीश होले, माजी उपमहापौर संदीप जाधव, प्रवीण भिसीकर, उमा गाठीबांधे, यशश्री नंदनवार, प्रकाश तोतवानी, भूषण शिंगणे, विक्की कुकरेजा, संजय बंगाले, वर्षा ठाकरे, दयाशंकर तिवारी, बाल्या बोरकर, माया इवनाते, साधना बरडे, गोपाल बोहरे, नीता ठाकरे, बंटी कुकडे, जोत्स्ना भिसीकर, संगीता कळमकर, रमेश सिंगारे, रिता मुळे, लक्ष्मी यादव, नीलिमा बावणे, दिव्या धुरडे, रश्‍मी फडणवीस, संगीता गिऱ्हे, मीना तिडके, संकेत फुके, पल्लवी श्‍यामकुळे.

शिवसेनेचे वेट ऍण्ड वॉच
भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या यादी केव्हा जाहीर होते याकडे शिवसेना लक्ष ठेवून आहे. ती जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चांगले उमेदवार गळाला लागतील, अशी अपेक्षा असल्याने शिवसेनेने वेट ऍण्ड वॉच धोरण अवलंबले आहे.

Web Title: politics in municipal election