मतदान केंद्रावर आली केंद्राध्यक्षाला फिट 

mirgi man
mirgi man

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्‍यातील सोनाळा येथील मतदान केंद्रावर आज, सोमवारी मतदानादरम्यान केंद्राध्यक्षाला फिट आली. 
लोणार येथील शिक्षक विनोद नारायण कराळे हे सोनाळा येथील मतदान केंद्रावरील बुथ क्र. 101 वर केंद्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फिट आल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती सोनाळा येथील तलाठी तथा मास्टर ट्रेनर सिद्धेश्वर रंगधळ यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com