पॉलिटेक्‍निकचे ‘तंत्र’ बिघडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नागपूर - अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेशाच्यावेळी पॉलिटेक्‍निकमध्येही जातवैधता  प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येत असल्याने २२ हजारांवर जागांसाठी सहा दिवसांत केवळ ४५० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. आधीच मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असताना वैधतेमुळे महाविद्यालयांचे तंत्र बिघडले आहे. विशेष म्हणजे समाजकल्याण विभागाकडून कुठलाही अध्यादेश नसल्याने जातवैधता प्रमाणपत्र देता येणे शक्‍य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. 

अभियांत्रिकी शाखेत नोंदणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दाखला देत, जातवैधता प्रमाणपत्राशिवाय नोंदणी करण्याचे आदेश राज्यातील सीईटी सेलने दिले. 

नोंदणीला अर्धे दिवस उरले असताना, या नियमाला शिथिल करून प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या स्लीपवर नोंदणीची मुभा देण्यात आली. याचाच फटका अभियांत्रिकी प्रवेशाला बसला. २१ हजार  जागांसाठी केवळ १६ हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे या शाखेमध्ये सात हजारांवर जागा रिक्त राहण्याचे संकट आहे. २१ जूनपासून पॉलिटेक्‍निक प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली. या नोंदणीसाठीही जातवैधता प्रमाणपत्राची अट टाकण्यात आली. यासाठी बऱ्याच पालकांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर केले.

मात्र, त्यांना पॉलिटेक्‍निकसाठी असा कुठलाही अध्यादेश नसून केवळ जातवैधता प्रमाणपत्राऐवजी जातप्रमाणपत्रावर प्रवेश घेता येत असल्याचे सांगून पालकांना परत पाठविण्यात येत आहे. १६ जुलै नोंदणीची शेवटली तारीख असल्याने त्यात फारशी वाढ होण्याची शक्‍यता नाही.

अध्यादेश नसताना सक्ती का?
पॉलिटेक्‍निकसाठी अशाप्रकारची कुठलीही तरतूद नाही. नोंदणीसाठी केवळ जातप्रमाणपत्र  आवश्‍यक असताना त्याची सक्ती का केली जात आहे, असा प्रश्‍न पालकांचा आहे. 

प्रोफार्मा देण्यास शाळांचा नकार
पालकांना जातवैधता प्रमाणपत्रासाठी ज्या शाळेत विद्यार्थी शिकला त्या शाळेतून एक प्रोफार्मा  भरून घेतला जातो. मात्र, शाळांतर्फे प्रोफार्मा देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत. 

Web Title: polytechnic admission issue