Vidhan Sabha 2019 : वऱ्हाडात मतदानाचा जोर कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

- अकोला जिल्ह्यात 29.70 टक्के
- वाशीम जिल्ह्यात 30.34 टक्के
- बुलडाणा जिल्ह्यात 30.91 टक्के जिल्ह्यात टक्के मतदान
- पिवंदळ खुर्द येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
- काही ठिकाणी मशिनमध्ये बिघाडीच्या घटना

अकोला  : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात 29.70, वाशीम जिल्ह्यात 30.34 टक्के व बुलडाणा 30.91 टक्के जिल्ह्यात टक्के मतदान झाले. मात्र, लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा जोर कमी दिसून येत आहे.
वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांतील 15 मतदारसंघात 171 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. निवडणूक शांततेत पार पडावी या अनुषंगाने मतदारसंघातील केंद्रावर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून, यंत्रणा सज्ज आहे. मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी होत असलेल्या रिमझिम पाऊसामुळे मतदारांमध्ये उत्साह कमी दिसत आहे. तर अकोला जिल्ह्यातील तळेगाव येथे इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने काही वेळ मतदान खोळंबले होते. तर दुसरी मशिन आल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. तसेच तेल्हारा तालुक्‍यातील पिवंदळ खुर्द या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यासोबत वाशीम जिल्ह्यातील उकळीपेन येथील मतदान केंद्रावर मशिन बंद पडली होती. अधिकाऱ्यांनी तत्काळ येथील मशिन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poor responce for voting in west vidarbha region of maharashtra