फेसबुक फ्रेंडने बनविले अश्‍लील फोटो

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नागपूर : जगाला जोडणारे माध्यम म्हणून फेसबुक तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. परंतु, काही महाभागांकडून फेसबुकसह अन्य सोशल साइट्‌सचा गैरवापर केला जात आहे. अज्ञात आरोपीने अशाच पद्धतीने मैत्रीचे जाळे फेकून युवतीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान हद्दीत राहणाऱ्या युवतीला अनोळखी व्यक्तीने फोसबुकवर फ्रेण्ड रिक्‍वेस्ट पाठविली. युवतीने सहजतेने ती स्वीकारली. हळूहळू आरोपीने चॅटिंग करीत युवतीचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्याआधारे अश्‍लील मॅसेज पाठविणे सुरू केले. युवतीने दम देताच आरोपी अधिकच चवताळला. फेसबुक अकाउंटवरील युवतीचे छायाचित्र मिळवून फोटो शॉपच्या माध्यमातून अश्‍लील फोटो तयार केले. ते फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेल्या युवतीने गिट्टीखदान ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगासह आयटी ऍक्‍टअन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pornographic photos made by Facebook Friend