सोशल मीडियावर पत्नीचे अश्‍लील फोटो

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

अमरावती :  दोघांच्या मध्ये तिसरी असल्यामुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण झाले. पतीचे विक्षिप्त वागणे तिच्या जिव्हारी लागले. कारण पतीनेच बेडरुमधील काही अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप पत्नीने केला.

अमरावती :  दोघांच्या मध्ये तिसरी असल्यामुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण झाले. पतीचे विक्षिप्त वागणे तिच्या जिव्हारी लागले. कारण पतीनेच बेडरुमधील काही अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप पत्नीने केला.
फ्रेजरपुरा परिसरात राहणाऱ्या युवतीचे नोव्हेंबर 2017 मध्ये गाडगेनगर परिसरातील एका प्रशस्त मंगल कार्यालयात लग्न झाले. कुटुंबीयांनी लग्नामध्ये आकर्षक भेटवस्तू, अधिक दागिने दिले नाही. म्हणून पतीसह सासरच्यांनी तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू केला. मारहाणही झाली. डिसेंबर 2017 मध्ये पतीने बळजबरीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले. पती अनेकदा बेडरुममध्ये अश्‍लील फोटोसह, चित्रीकरण करण्यासाठी दबाव टाकत होता. त्याच्या विचित्र वागण्यामुळे पत्नी नेहमीच मानसिक दडपणाखाली वावरत होती. लग्नापूर्वीपासून पतीच्या संपर्कात एक युवती होती. ती त्यांच्या लग्नानंतरही पतीच्या सातत्याने संपर्कात होती. घरी मुक्काम असताना, दोघेही एकांतात बोलायचे, त्यावरून पतीने पत्नीवरही अशाच पद्धतीने वागण्याचा आग्रह धरला. पत्नीने नकार देताच माहेरी सोडून दिले. असा आरोप पीडित विवाहितेने केला. 19 एप्रिल 2018 पासून पत्नीचे जे खासगी अश्‍लील फोटो पतीने काढून ठेवले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले. तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव आणला. पतीने पत्नीच्या माहेरी जाऊन पत्नीसह तिच्या नातेवाइकांना धमक्‍या दिल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला.

समुपदेशनही ठरले व्यर्थ
कौटुंबिक वादाचे प्रकरण असल्याने पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल न करता, समुपदेशासाठी प्रकरण महिला सेलकडे पाठविले. परंतु समुपदेशनानंतही या प्रकरणात पती-पत्नीमध्ये तडजोड होऊन शकली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pornographic photos of wife on social media