file photo
file photo

आमिषाला बळी पडणे भोवले, वाचा काय झालं...

सेलू (जि.वर्धा) ः विमा अभिकर्ता असलेल्या एका महिलेला ग्राहक मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला बोलावून तिचे इच्छेविरुद्ध संभोग केला व व्हिडीओ काढून व्हायलर करण्याची धमकी देऊन पाच लाखाची मागणी केली, या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सेलू पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून एका महिलेसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना सोमवारपर्यंत (ता.अकरा) पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. 

सेलू पोलिसांच्या माहितीवरून फिर्यादी महिला ही नागपूर येथे एका खाजगी कंपनीत विमा अभिकर्ता म्हणून कामाला होती. पॉलिसी काढण्याच्या कामावरून आरोपी उज्वल राननवरे(48) रा. सालई, होमा उर्फ प्रकाश बावणे (35) रा. हिंगणी, शंकर चिकराम (51) रा. धानोली (गावंडे) आणि फिर्यादी यांची ओळख झाली तर यातील महिला आरोपी ही फिर्यादीची सहकर्मी होती. तिला काही दिवसापूर्वी कामावरून कमी केले होते. फिर्यादीसोबत असलेल्या ओळखीमुळे आरोपीनी फिर्यादिस तालुक्‍यातील खडकी येथे बोलाविले आणि गुंगीचे औषध देऊन तिला शेतशिवारात नेले. घटनास्थळावर तिचे इच्छेविरुद्ध तिन्ही आरोपींनी संभोग केला. यावेळी सहकर्मी असलेल्या महिला आरोपीच्या सांगण्यावरून घटनेचा व्हिडीओ तयार केला. आणि नंतर हा व्हिडीओ व्हायलर करण्याची धमकी देऊन फिर्यादी महिलेस पाच लाखाची मागणी केली. मागणी पूर्ण होण्याचे संकेत नसल्याने सहकर्मी महिला आरोपींने तो व्हिडीओ व्हायलर केला. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून सेलू पोलिसात महिलेसह चार आरोपीवर कलम 376(2)(जे), 385,500,34 भादवी सह 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com