नागपूरात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

नागपूर - दोन-तीन दिवस वादळी पावसाने तडाखा दिल्यानंतर विदर्भात पुन्हा एकदा अवकाळीची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पाऊस व ढगाळ वातावरण एक-दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर उन्हाचे तीव्र चटके बसणार आहेत.

उत्तर भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सरासरी तापमानातही दोन ते पाच अंशांची घसरण झाली. मंगळवारी नागपूरचा पारा या महिन्यात प्रथमच ३५ अंशांवर आला होता. शुक्रवारी व शनिवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्‍या पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: possibility of rain in Nagpur