पदव्युत्तर महाविद्यालयांचे प्रवेश होणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यापीठ कॅम्पससह संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश हे पुढील शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी विद्यापीठाच्या वतीने केंद्रीय प्रवेश पद्धती राबविली जाणार असून, कला, विज्ञान व वाणिज्य अशा सर्वच शाखांचा यात समावेश राहणार आहे. विशेष बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत याला मान्यताही मिळाल्याची माहिती  कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

राज्यातील अकृषक विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशात पारदर्शकता आणण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने मागीलवर्षी ऑनलाइन प्रवेश पद्धती राबविली जाईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे विद्यापीठाने मागील वर्षी केंद्रीय प्रवेश पद्धतीने प्रवेश  घेणे टाळले. मात्र, राज्य सरकारने या दिशेने कुठलेही पावले उचलले नसल्याने विद्यापीठ स्वत: केंद्रीय प्रवेश पद्धतीने प्रवेश घेणार आहे.

विद्यापीठस्तरावर दरवर्षी नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी झुंबड असल्याचे दिसते. अनेकदा विद्यार्थ्यांची डोनेशनच्या रूपात आर्थिक लूट महाविद्यालयांकडून करण्यात येते. शिवाय गुणवत्तेला डावलून बरेचदा कमी टक्के असतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याची बाब समोर आली आहे. अनेक  महाविद्यालयांतील जागा रिक्त असताना विद्यापीठांकडून या अभ्यासक्रमातील दहा ते वीस टक्के जागा वाढवून देण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव येत असतात. त्याला उच्च शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात येते. काही महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त असताना, दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये वाढीव जागांची मागणी वारंवार होते. त्यामुळे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढल्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने घेतले जाणार आहेत.

३०० महाविद्यालयांचा समावेश
केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये जवळपास ३०० महाविद्यालयांचा समावेश राहणार आहे. यातील जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होतील. त्यामुळे यंदा होणारे प्रवेश हे गुणवत्तेच्या आधारावरच होतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. याशिवाय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन शेड्युल दिला जाणार आहे.

नवीन सॉफ्टवेअर तयार
विद्यापीठाने केंद्रीय प्रवेश पद्धतीसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार केले आहे. १५ मार्चला याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्व संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्यांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे, हे विशेष.

Web Title: post graduate college admission online