ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

आयोग लागू करण्यासाठी संघटनेने दोन वर्षांत संप, धरणे, मोर्चे, उपोषण केले. परंतु कार्यवाही न झाल्याने ग्रामीण डाकसेवक यांच्या चारही संघटनांनी संपाची नोटीस दिली आहे. त्यानुसार मंगळवार (ता.२२) पासून बेमुदत संपाचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला (बाभूळगाव) : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार देशभरातील सुमारे २.७० लाख डाकसेवक येणाऱ्या मंगळवारी (ता.२२) पासून संपावर जात आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सचीव एच.बी.फाटकर यांनी केले आहे.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आयोग देऊन जवळपास २ वर्ष होत आहेत. डाक विभागातील ग्रामीण डाकसेवकांना अद्याप वेतन आयोग देण्यात आला नाही. त्या करीता देशभरातील डाकसेवक यांनी ता.१६ अॉगस्ट ते २२ अॉगस्ट २०१७ दरम्यान सात दिवस संप केला. लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत आयोग लागू करण्यात आला नाही.

आयोग लागू करण्यासाठी संघटनेने दोन वर्षांत संप, धरणे, मोर्चे, उपोषण केले. परंतु कार्यवाही न झाल्याने ग्रामीण डाकसेवक यांच्या चारही संघटनांनी संपाची नोटीस दिली आहे. त्यानुसार मंगळवार (ता.२२) पासून बेमुदत संपाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: post office employee strike