सिनेट सभा स्थगित करा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे उद्या, गुरुवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता सिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, उद्याच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी असल्याने सिनेट बैठक स्थगित करा, अशी मागणी करणारे पत्र आणि ई-मेल सदस्यांनी कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांना पाठविले आहे. विशेष म्हणजे मतमोजणीमुळे सदस्य संख्येचा (कोरम) प्रश्‍न निर्माण होण्याची स्थिती आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार दरवर्षी सिनेटच्या दोन बैठका होणे गरजेचे आहे. या बैठकांमधील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे, असेही या कायद्यात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ऑक्‍टोबर आणि मार्च या दोन महिन्यांत सिनेटच्या दोन बैठकांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 21 ऑक्‍टोबरला सिनेटच्या बैठका घेण्याचे ठरले होते. मात्र, निवडणुकांच्या घोषणेत 21 ऑक्‍टोबरला विधानसभेसाठी मतदान असल्याने त्या दिवशी होणारी सिनेट बैठक पुढे ढकलण्यात आली. यानंतर नव्या तारखेसाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. यावेळी राज्यपालांकडून 24 तारखेला बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. यातूनच 24 ऑक्‍टोबरला सिनेटची बैठक घेण्यात येईल. मात्र, उद्या मतमोजणी असल्याने या बैठकीत सदस्यांची उपस्थिती नगण्य असण्याची शक्‍यता आहे. याचे कारण असे की, सिनेटमध्ये निवडून आलेले बहुतांश प्रतिनिधी कुठल्या ना कुठल्या पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे या बैठकीत ते अनुपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी पत्र आणि ई-मेल च्या माध्यमातून बैठक घेऊन ती तत्काळ नव्या तारखेपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कुलपतीच्या परवानगीचीही गरज पडणार नाही.
बैठक ठरणार नाममात्र
सिनेट बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नासह विद्यापीठातील विविध विषयांवर चर्चा होत असते. त्यासाठी पदवीधर आणि शिक्षक गटातून निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम करतात. मात्र, यावेळी प्रश्‍न आणि प्रस्तावही बरेच कमी आहे. त्यात बरेच सदस्य अनुपस्थित राहणार असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नावर चर्चाच होणार नसल्याचे चित्र राहण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com