पोतदार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा 

rajiv potdar
rajiv potdar

नागपूर : सावनेरसह जिल्ह्यात चार जागांवर झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याने ओबीसी समाजाच्या नकारात्मकेचा भाजपला फटका बसल्याची कबुलीही त्यांनी दिली. 
सावनेरमध्ये भाजपने पोतदार यांना उमेदवारी दिली होती. येथील कॉंग्रेसचे उमेदवार आमदार सुनिल केदार यांनी त्यांचा सुमारे सत्तावीस हजार मतांच्या फरकाने पराभव केला. विशेष म्हणजे येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतली होती. 
भाजपचा पराभव अनाकलनीय आहे. ग्रामीणमधील काटोल, सावनेर, रामटेक आणि उमरेड मतदार संघातील भाजपचा पराभव झाला. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन जाहीर केले. आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रचाराची सर्व रचना केली. या निवडणुकीसाठी मागील तीन वर्षांपासून कठोर मेहनत घेतली. सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून जीवाचे रान केले. तरीसुद्धा झालेला पराभव धक्कादायक आहे. जातीयवादाचे विष कालविण्यात विरोधक यशस्वी झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी नाकारल्याने ओबीसी समाजाचा रोष सहन करावा लागला. त्याचमुळे अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागले, असे प्राथमिकदृष्ट्या दिसते. सावनेरमध्ये पक्षांतर्गत दगाफटका बसल्याची शंका व्यक्‍त करून त्यांनी पराभवाची कारणमिमांसा करू, असे पत्रात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com