अनैतिक संबंधातून भांडी व्यापाऱ्याचा खून 

अनैतिक संबंधातून भांडी व्यापाऱ्याचा खून 

नागपूर - जरीपटक्‍यात अनैतिक संबंधातून एका भांडी व्यापाऱ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. हे हत्याकांड  सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आले. या प्रकरणी आरोपी मायलेकास पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शाबिर लाल हाश्‍मी (वय ४०, रा. म्हाडा कॉलनी, जरीपटका) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया (वय ४०, रा. म्हाडा कॉलनी) ही पती व समीर नावाच्या मुलासह राहते. ती एका बिर्याणीच्या ठेल्यावर कामाला जाते. तिची ओळख भांडी व्यापारी मोहम्मद शाबिर हाश्‍मी याच्यासोबत झाली. तो म्हाडा क्‍वॉर्टरमध्ये राहतो. तर त्याची पत्नी मुलांसह कळमन्यात राहते. सोनिया आणि शाबिरची मैत्री झाली. सोनियाचे पती लकवाग्रस्त असल्यामुळे त्यांना बेडवरून उठता येत नाही. सोनिया आणि शाबिरचे संबंध वाढल्याने अनैतिक संबंध निर्माण झाले. सोनिया ही नेहमी शाबिरच्या घरी येत होती. मुलगा समीर सीताबर्डीत चप्पल विक्रीचे दुकान लावतो. मुलगा दिवसभर घरी नसल्यामुळे शाबिर हा नेहमी घरी येत होता. यापूर्वीही, शाबिरने सोनियाला अनेकदा मारहाण केली होती. सोनियाचे अन्य चार ते पाच लोकांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती शाबिरला मिळाली. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी सोनियाला शाबिरने घरात कोंडून जबर मारहाण केली होती. तसेच अन्य लोकांशी असलेले अनैतिक संबंध तोडण्यास सांगितले होते. शाबिरने मारहाण केल्याची बाब तिने मुलगा समीरला सांगितली. दोघांनी मिळून शाबिरचा गेम करण्याची योजना आखली. योजनेप्रमाणे रविवारी रात्री दहा वाजता सोनिया आणि समीर शाबिरच्या घरी गेले. दारूच्या नशेत असलेल्या शाबिरसोबत वाद झाला. त्यानंतर दोघांनीही मिळून शाबिरवर कोणत्या तरी जड वस्तूने प्रहार करीत जखमी केले. तो जमिनीवर कोसळल्यानंतर दोघांनीही दगडाने ठेचून खून केला. शाबिरचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोघांनीही पळ काढला. आज सोमवारी सकाळी हत्याकांड उघडकीस आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेयोत पाठवला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.  

चार तासांत लागला छडा
मो. शाबिरचा खून झाल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेने चार तासांत हत्याकांडाचा छडा लावला. आरोपी समीर व सोनियाला लगेच अटक केली. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली. समीर पूर्वी मुंबईत चित्रपटसृष्टीत डान्सर म्हणून काम करीत होता. मात्र, वडिलाच्या आजारपणामुळे तो पुन्हा नागपुरात आला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com