वीज प्रकल्पांलगत उभे राहणार उद्योग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नागपूर - ऊर्जा प्रकल्पात निर्माण होणाऱ्या राखेच्या 100 टक्के वापराच्या धोरणाला आज राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली. त्यानुसार वीज प्रकल्पांच्या जागेवरच छोटेखानी औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. कोराडी, खापरखेडा येथे राखेवर आधारित उद्योग उभारण्यास इच्छुक काही कंपन्यांशी शुक्रवारी सामंजस्य करार केले जाणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे.

औष्णिक ऊर्जा प्रकल्पात जाळल्या जाणाऱ्या कोळशाच्या 40 टक्के राखेची निर्मिती होते. राखेची विल्हेवाट महानिर्मितीसमोरील मोठे आव्हान होते. राख वाहून नेताना होणारे प्रदूषण हीसुद्धा मोठी समस्या आहे. यामुळे वीज प्रकल्पांमधील "ऍश बन'लगतच आधारित उद्योग उभारून राखेचा 100 टक्के वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन, उद्योग आणि त्याद्वारे रोजगाराची निर्मिती होणार आहे. राखेच्या व्यवस्थापनासह उद्योगांच्या सहकार्यासाठी महानिर्मितीने महागॅम्स या उपकंपनीचे गठन केले आहे. या कंपनीचे प्रादेशिक कार्यालय विद्युत भवनात सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते कार्यालयाचे उद्‌घाटन होईल. राखेवर आधारित उद्योग सुरू करण्यासंदर्भात बऱ्याच कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली आहे. मुख्यालयाकडून कंपन्यांची चाळणी सुरू आहे. उद्‌घाटनीय सोहळ्यातच काही औद्योगिक कंपन्या आणि रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. महागॅम्सचे संचालक सुधीर पालिवाल यांनीही या माहितीला दुजोरा दिला.

राखेवर आधारित उद्योग
फ्लाय ऍशचा उपयोग सिमेंट कारखाने, सिमेंट रस्त्यांसाठी करण्यात येतो. विटा आणि ब्लॉक तयार करण्यासाठीही राखेचा वापर करण्यात येत असला तरी एकूण उत्पादित होणाऱ्या राखेपैकी केवळ 35 ते 37 टक्केच राखेचा वापर होऊ शकतो. राखेद्वारे पॅनलसह अन्य उत्पादने करणारे उद्योग सुरू राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.

सद्यस्थितीतील फ्लाय ऍश वापर
वीजप्रकल्प राखेचे उत्पादन (मे.टन) राखेचा वापर (टक्के)
खापरखेडा 160523.71 37.55
कोराडी 11108 31.60

Web Title: the power industry will be standing nearby projects