पाण्यावरून सत्ताधारी, विरोधकांनी केली प्रशासनाची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची आठवण करून दिली. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी शहरातील पाण्याबाबत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावे तसेच सात दिवसांत कृती अहवाल सादर न केल्यास जलप्रदाय विभागाच्या प्रमुखावर निलंबनाची कारवाई करावी, या गुडधे यांच्या मागणीवर जोशी यांनी महापौरांना सूचना केला. महापौरांनी तत्काळ निर्देश दिले.

नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची आठवण करून दिली. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी शहरातील पाण्याबाबत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावे तसेच सात दिवसांत कृती अहवाल सादर न केल्यास जलप्रदाय विभागाच्या प्रमुखावर निलंबनाची कारवाई करावी, या गुडधे यांच्या मागणीवर जोशी यांनी महापौरांना सूचना केला. महापौरांनी तत्काळ निर्देश दिले. महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महाल येथील नगरभवनात पार पडली. शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर पाण्यावरून विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर चांगलेच तोंडसुख घेतले. विरोधी बाकावरील कॉंग्रेस सदस्य प्रफुल्ल गुडधे पाटील व सत्ताधारी बाकावरील ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पाणीटंचाईवर स्थगन दिला. गुडधे पाटील यांनी स्थगनद्वारे चर्चेला सुरुवात केली. 24 बाय 7 अखंड पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंपनीला देण्यात आले. कोणत्या भागात 24 तास पाणी मिळत आहे? किती लोकांना शुद्धपाणी मिळते? पाण्याचे समान वितरण होत आहे का? 11 एप्रिलनंतर पाणीपुरवठा कमी का? मृतसाठा वापरण्याची परवानगी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिली होती का? आदी प्रश्नांची सरबत्ती केली. सहा महिन्यांपूर्वी मनपा सभेत पिण्याच्या पाण्यासंदर्भात कृती अहवाल सादर करावा, असे निर्देश महापौरांनी दिले होते. तो अहवाल सभागृहात सादर करण्यात आला नसल्याची बाबही गुडधे यांनी निदर्शनास आणून दिली. यावेळी सत्तापक्ष संदीप जोशी यांनीही कृती अहवाल सादर न केल्याबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. महापौरांचे आदेशही पायदळी तुडविले जात आहेत. याची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची गरज व्यक्त करीत जोशी यांनी सात दिवसांत कृती अहवाल सादर करण्याची सूचना महापौरांना केली. यावेळी गुडधे यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी प्रशासनाला सात दिवसांत कृती अहवाल सादर करा, सादर न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश आयुक्तांना दिले. मनोज सांगोळे यांनी अग्निशमन विभागाच्या व चोकेज दुरुस्तीसाठी सार्वजनिक विहिरींमधील पाण्याचा वापर करावा अशी सूचना केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जितेंद्र घोडेस्वार, हरीश ग्वालबंशी यांनीही चर्चेत भाग घेता संताप व्यक्त केला. नोटीसवर चर्चेस महापौरांनी नकार दिल्याने आभा पांडे चांगल्याच संतापल्या. त्यांनी सभेनंतर प्रभागात पाणी येत नसून माझा नव्हे तर महापौरांनी प्रभागातील 30 हजार नागरिकांचा अपमान केल्याचा आरोप केला. महापौरांच्या निषेधार्थ उद्या, शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता झोन कार्यालयात जलत्याग आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सभेनंतर सांगितले. यावेळी या गोरेवाडा तलावात 473 एमएलडी पाणी असल्याचे कार्यकारी अभियंता श्‍वेता बॅनर्जी यांनी सांगितले. शहराला आता 670 एमएलडी पाण्याचा पुरवठा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणासाठी आणलेले जेसीबी दोन दिवसांपासून उभे असून त्याचे भाडे कोण देणार? असा प्रश्‍न उपस्थित करीत कॉंग्रेसचे हरीश ग्वालवंशी व कमलेश चौधरी यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The power of the ruling party, the opponents took control of the administration