हेविवेट नेत्यांचे दडपण; पण टेंशन नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या हेविवेट नेत्यांचे तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. स्मार्ट सिटीसह मेट्रो रेल्वेसुद्धा येथे झपाट्याने विकसित होत आहे. नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असताना दुसरीकडे तिजोरीत फारसा पैसा नाही, अशा महापालिकेत नियुक्ती झाल्याने दडपण राहणारच. मात्र, पारदर्शी कारभार, कालबद्ध प्रकल्पांची आखणी, शिस्त व मेहनतीने आपण या परीक्षेत निश्‍चितच उत्तीर्ण होऊ, असा विश्‍वास नवनियुक्त आयुक्त अश्‍विन मुदगल यांनी व्यक्त केला. 

अश्‍विन मुदगल मूळचे ग्वाल्हेरचे. काही काळ अंदमान येथे होते. 2004 मध्ये महाराष्ट्रात आले. यवतमाळ आणि सातारा जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी होते. महसूल क्षेत्रातच आजवर काम केल्यानंतर प्रथमच नागपूर महापालिकेत आले आहेत. बुधवारी सकाळी दहा वाजता श्रावण हर्डीकर यांच्याकडून महापालिकेचा पदभार स्वीकारला. त्यांच्याकडून योजना जाणून घेतल्या. दिवसभर वेगवेगळ्या विभागप्रमुखांच्या भेटी घेतल्या. सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर सर्वच बाबतीत महत्त्वाचे शहर आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. जंगल सफारीचे प्रवेशद्वार आहे. खाद्य संस्कृतीतही वैविध्य आहे. विशेष म्हणजे विकासाच्या बाबतीत लिडरशिप पॉझिटिव्ह आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने आग्रही राहिलेच पाहिजे. आमचे काम फक्त अंमलबजाणीचे आहे. ती आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू. नागपूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा तणाव सुविधांवर येत आहे. यातून मार्ग काढावाच लागणार आहे. माजी आयुक्तांकडून चोवीस बाय सात, बस सेवा, कचऱ्याची विल्हेवाट या योजनांची माहिती जाणून घेतली. नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. कुठलाही प्रकल्प पारदर्शी आणि कालबद्ध असल्याने ताण येत नाही. प्राधान्यक्रम ठरवूनच यापुढे प्रकल्प हाती घेतले जातील आणि ते पूर्ण केले जातील. हे सर्व करण्यासाठी महापालिकेचे उत्पन्न वाढवावेच लागेल असेही आयुक्तांनी सांगितले. 

इशारा कोणाला? 
महापालिकेच्या निवडणुकीतील विशेषतः मुंबई महापालिकेतील पारदर्शी कारभाराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजप आणि शिवसेनेत याच शब्दावरून वाक्‌युद्ध रंगले. संपूर्ण प्रचाराचा मुद्दा पारदर्शी हाच होता. नवनियुक्त आयुक्त मुदगल यांनीसुद्धा पहिल्याच दिवशी पारदर्शी कारभारावर भर दिल्याने त्यांचा इशारा कोणाकडे प्रश्‍न अनेकांना पडला आहे. 

Web Title: powerful leader nagpur