प्रफुल्ल पटेल अध्यक्षपदी कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल महासंघाची (डब्ल्यूआयएफए) आमसभा उद्या (ता. 23) नागपुरात होणार आहे. विद्यमान अध्यक्ष प्रफुल्ल पटेल पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून, नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे (एनडीएफए) अध्यक्ष हरेश वोरा व सचिव इकबाल कश्‍मिरी हेही कार्यकारिणीवर निवडून आले आहेत. आमसभा दुपारी तीन वाजता सिव्हिल लाइन्समधील चिटणवीस सेंटरमध्ये होणार आहे. आमसभेत 2019 ते 2023 या चार वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. 13 सदस्यीय कार्यकारिणीसाठी केवळ 13 अर्ज आल्याने कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. आता केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे. वोरा दुसऱ्यांदा उपाध्यक्ष राहतील.

नागपूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल महासंघाची (डब्ल्यूआयएफए) आमसभा उद्या (ता. 23) नागपुरात होणार आहे. विद्यमान अध्यक्ष प्रफुल्ल पटेल पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून, नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे (एनडीएफए) अध्यक्ष हरेश वोरा व सचिव इकबाल कश्‍मिरी हेही कार्यकारिणीवर निवडून आले आहेत. आमसभा दुपारी तीन वाजता सिव्हिल लाइन्समधील चिटणवीस सेंटरमध्ये होणार आहे. आमसभेत 2019 ते 2023 या चार वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. 13 सदस्यीय कार्यकारिणीसाठी केवळ 13 अर्ज आल्याने कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. आता केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे. वोरा दुसऱ्यांदा उपाध्यक्ष राहतील. कश्‍मिरीही प्रथमच राज्य कार्यकारिणीवर जाणार आहेत. आमसभेला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निरीक्षकही येणार असल्याची माहिती वोरा यांनी दिली.
नवीन कार्यकारिणी : अध्यक्ष : प्रफुल्ल पटेल (गोंदिया), उपाध्यक्ष : हरेश वोरा (नागपूर), विश्‍वजित कदम(पुणे), मालोजी राजे(कोल्हापूर), पार्थ जिंदल(पालघर), आदित्य ठाकरे(मुंबई). सचिव : सॉटर वाझ (मुंबई), कोषाध्यक्ष : प्यारेलाल चौधरी (पुणे), सहसचिव : सुशील सुर्वे(अमरावती), सलीम परकोटे(लातूर), किरण चौगुले(सोलापूर). कार्यकारिणी सदस्य : इकबाल कश्‍मिरी (नागपूर). अहमद लालानी (भंडारा), रवींद्र दरेकर (गडचिरोली), दीपक दीक्षित (चंद्रपूर), अब्दुल रौफ (अमरावती), पी. व्ही. अहळे (यवतमाळ), योगेश परदेशी (नंदूरबार), साजिद अन्सारी (नांदेड), असघर पटेल (हिंगोली), माणिक मंडलिक (कोल्हापूर), गॉडविन डिक (अहमदनगर), सुलेमान जग्गू(सांगली), आनंद कालोरकर(वर्धा).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praful Patel elected unopposed as president of WIFA