आंबेडकरांची वेगळी चूल भाजपच्या सोयीची - जोगेंद्र कवाडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नागपूर - रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी न करता वंचितांच्या नावावर उभा केलेला नवा सुवतासुभा भाजपच्या सोयीसाठी असल्याचे मत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.

त्यादृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोनवेळा बैठका घेतल्या. बैठकीला प्रकाश आंबेडकर हजर राहीले नाहीत. याउलट ते ‘एमआयएम’ या पक्षाशी आघाडी करून मेळावे घेत आहेत. त्यांनी यासाठी वंचिताची आघाडी निर्माण केली आहे. या वंचिताच्या आघाडीतून वंचिताचा फायदा तर होणार नाही झालाच तर ‘लब्धप्रतिष्ठित’ भाजपला होईल, असे ‘सरकारनामा’शी बोलताना जोगेंद्र कवाडे म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांचा हा मार्ग भाजपला मजबूत करण्यासाठी असल्याची भावना रिपब्लिकन जनतेमध्ये आहे. ‘एमआयएम’बद्दल हीच भावना मुस्लिम समाजामध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये नांदेड व परभणी येथे एमआयएमचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. 

एमआयएमला मत म्हणजे नेमका कुणाला फायदा? याचे गणित या शहरांमधील मुस्लिम मतदारांना कळले आहे. हेच गणित राज्यातील रिपब्लिकन जनतेलासुद्धा कळले आहे. त्यामुळे आंबेडकरांनी हा मार्ग सोडून धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये यावे, असे आवाहन कवाडे यांनी केले आहे.

प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये
आंबेडकरांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकांना येण्यात त्यांना कमीपणा वाटत असेल तर त्यांनी बैठक आयोजित करावी. बैठकीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असे कवाडे यांनी सूचविले. परंतु, कोणते तरी कारण सांगून मतांच्या विभाजनाचे राजकारण करायचे असल्यास ही चाल रिपब्लिकन जनता उमजून आहे, हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे, असा इशारा कवाडे यांनी दिला.

Web Title: Prakash Ambedkar BJP Jogendra Kawade Politics