वंचित आघाडीचे पत्ते उघडणार बुधवारी

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

अकोला ः लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी निवणूक लढल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल, अशी घाेषणा आघाडीचे राज्य समन्वयक माजी आमदार हरिदास भदे यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमंसचे राष्ट्रीय नेेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. काँग्रेसने १२ जागांचा प्रस्ताव मान्य केल्यास आमची ४८ जागा लढविण्याची तयारी असून, याबाबतची भूमिका २३ जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात येईल, असे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

छगन भुजवळ हे ओबीसींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांची नाशिक येथे भेट झाली हाेती. त्यानंतर औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी भुजबळ यांची भेट घेतली. भेटीत त्यांनी नाशिकमधून लढल्यास त्यांना पाठिंबा देणार असल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र अद्याप त्यांच्याकडून सत्कारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असेही भदे म्हणाले. पत्रकार परिषदेला भािरप-बमंसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, ऍड. संताेष रहाटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डाॅ. प्रसन्नजित गवई, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर आदी उपस्थित हाेते.

वंचितांना न्याय मागणीसाठीच जागांंचा आग्रह
भाजप सरकारच्या विराेधात समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र संताप आहे. निवडणुकीत धनगर, काेळी, धाेबी यांच्यासह अनेक समाजघटकांना विविध आश्वासने दिली हाेती. मात्र ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना प्रचंड गर्दी हाेत असून आमची लढाई विचारांची आहे. आघाडीची शक्ती दिवसेंदिवस वाढतच असून, आम्ही वंचित घटकांना प्रतिनिधत्व मिळावे यासाठी लाेकसभा निवडणुकीत जागांची मागणी केल्याचे हरिदास भदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com