Loksabha 2019 : जो पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला काय देणार: आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा भंडारा शहरात घेण्यात आली असून त्यांनी नरेंद्र मोदी, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यावर सडकून टीका केली.

भंडारा : जो व्यक्ती आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला काय न्याय देईल, अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली, तर आम्ही उमेदवार लढविले म्हणून शरद पवार व प्रफुल्ल पटेलांनी माघार घेतली असेही म्हटले आहे.  

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा भंडारा शहरात घेण्यात आली असून त्यांनी नरेंद्र मोदी, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यावर सडकून टीका केली.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार कारू नान्हे यांच्या प्रचारा करीता आज प्रकाश आंबेडकर आले होते. या सभेला संबोधित करताना त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले, कि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार लढविल्याने प्रफुल्ल पटेल व शरद पवार यांनी स्वतः निवडणूक लढविली नाही. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला न्याय कशा प्रकारे देणार असे भाषणात बोलताना म्हटले आहे.

Web Title: Prakash Ambedkar targets PM Narendra Modi on family issue in Bhandara