प्रकाश जावडेकर म्हणाले, महायुती कॉंग्रेसचा रेकॉर्ड तोडणार 

PRAKASH JAWDEKAR
PRAKASH JAWDEKAR

नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "क्‍लिक' झाल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. 
शुक्रवारी भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरात आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार अजय संचेती, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर कोहळे, आमदार अनिल सोले, शहराध्यक्ष प्रवीण दटके त्यांच्यासोबत होते. एअर इंडिया डबघाईस आणण्यास माजी मंत्री प्रफुल्ल पटेल कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. 18 हजार कोटींच्या कंपनीला क्षमता नसताना 60 हजार कोटींचा सौदा करायला लावला. विमानतळाजवळचे एआरएचे काम बिल्डरला त्यांनीच दिले. इंडिगो आणि जेटसारख्या कंपन्यांची विमाने 20 तास काम करायची, तेथे एअर इंडियाची विमाने केवळ नऊ तासच काम करायची. त्यामुळे एअर इंडियाची स्थिती बिघडली. मी जनतेसाठी शंभर रुपये पाठवतो, पण जनतेपर्यंत 15 रुपयेच पोहोचतात, असे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी म्हणाले होते. कारण, त्यांचेच नेते मधल्या मध्ये पैसे खात होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शंभर रुपये पाठवतात आणि पूर्ण पैसे जनतेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे देश प्रगतिपथावर निघाल्याचे जावडेकर म्हणाले.
पवारांना पक्ष सांभाळणे अवघड 
एकेकाळी शरद पवार स्वतःच्या पक्षासोबत इतरही पक्ष चालवायचे. पण, कॉंग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीमुळे आज त्यांना स्वतःचाच पक्ष चालविणे अवघड होऊन बसले आहे. आता तेही थकले आणि आम्हीही थकलो, असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे नुकतेच म्हणाले. त्यामुळे राज्यात आज त्यांची स्थिती दयनीय झाल्याचे जावडेकर म्हणाले. 
सावरकरांना विरोध का? 
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कॉंग्रेसचे नेते विरोध करीत आहे. पण, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे टपाल तिकीट काढले होते. हे कॉंग्रेसजन का विसरतात. एनआरसी करार राजीव गांधींनीच केला होता, हे कॉंग्रेसजन का विसरतात, असा सवाल जावडेकर यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com