प्रकाश पाटील देवसरकरांचा आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करीत असताना उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी शिवबंधन तोडून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या येथे शुक्रवारी (ता. 11) आयोजित जाहीर सभेत ते समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती श्री देवसरकर यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवसरकर यांनी सांगितले की, 'शिवसेनेतील आपला गेल्या पाच वर्षांचा अनुभव अतिशय क्‍लेशदायक आहे. लोकसंग्राहक नेत्याला काडीचीही किंमत नाही.

यवतमाळ : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करीत असताना उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी शिवबंधन तोडून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या येथे शुक्रवारी (ता. 11) आयोजित जाहीर सभेत ते समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती श्री देवसरकर यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवसरकर यांनी सांगितले की, 'शिवसेनेतील आपला गेल्या पाच वर्षांचा अनुभव अतिशय क्‍लेशदायक आहे. लोकसंग्राहक नेत्याला काडीचीही किंमत नाही. शिवसेनेत प्रवेश घेणे हाच चुकीचा निर्णय होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Patil Devasarkar joins Congress today