कर्जबाजारीपणामुळेच प्रमोद जाने यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

जलालखेडा : नरखेड तालुक्‍यातील मदना येथील प्रमोद जाने यांनी केलेली आत्महत्या कर्जबाजारी असल्यानेच केल्याचे तालुका प्रशासनाने मान्य केले आहे. प्रमोद जाने यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेऊन प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविले. यासाठी तब्बल पाच दिवसांचा वेळ घेतला. तथापि, पोलिसांनी जाने यांचा मृत्यू आजारपणातून झाल्याचे नोंदविले आहे.

प्रमोद यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी 23 ऑगस्टला घरीच गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून मुलीच्या लग्नासाठी, घरकुलासाठी व कर्जमाफीचा फायदा न मिळाल्याचा उल्लेख केला होता. फायनान्स कंपनीचा वसुलीसाठी जाच व लिलावाची धमकी हे कारणही त्यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे त्याच्या सुसाइड नोटमधून स्पष्ट होते. वडिलांचे आजारपण आणि स्वत:चे आजार यातही पैसा खर्च होत होता. यामुळेच त्यांचे वडील गोपाळराव जाने यांनी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रमोद जाने यांनी आत्महत्या केली. चिठ्ठीमधून त्यांची आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे स्पष्ट होत असतानाही पोलिसांनी आजारपणाचे कारण समोर केले आणि प्रशासनानेही या घटनेची दखल घेण्यास उशीर लावला.
"सकाळ'ने सर्वप्रथम प्रमोद जाने यांचा मृत्यू कर्जबाजारीपणातून झाल्याचे समोर आणले. यानंतर त्यांना मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख, भाजपचे प्रवीण लोहे यांनी जाने कुटुंबीयांची आर्थिक मदत केली आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत चांडक यांनी नरखेड बाजार समितीने आत्महत्याग्रस्त जाने कुटुंबीयांना मदत करावी अशी मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramod Jani commits suicide due to indebtedness