प्रमोद मानमोडे कॉंग्रेसमध्ये दाखल

नागपूर : मोद मानमोडे यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत करताना अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार व विकास ठाकरे. शेजारी अतुल लोंढे, सेवक वाघाये, अतुल कोटेचा, अनंतराव घारड.
नागपूर : मोद मानमोडे यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत करताना अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार व विकास ठाकरे. शेजारी अतुल लोंढे, सेवक वाघाये, अतुल कोटेचा, अनंतराव घारड.

नागपूर : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार देणारे निर्मल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मानमोडे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
मानमोडे यांनी दक्षिण नागपूरमधून निवडणूक लढण्याची आधीच घोषणा केली आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराची तयारीसुद्धा सुरू केली आहे. विशेष म्हणजे ते मूळचे कॉंग्रेसचेच कार्यकर्ते आहेत. कॉंग्रेसमधील अधिकृत प्रवेशाने त्यांची दक्षिणची दावेदारी भक्कम झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा प्रचार केला होता. त्यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावासुद्धा आयोजित केला होता. तेव्हापासूनच ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज प्रवेशाचा मुहूर्त निघाला. विशेष म्हणजे दक्षिण नागपूरवर विलास मुत्तेमवार यांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार यांनीसुद्धा दावा केला आहे. डॉ. बबनराव तायवाडे हेसुद्धा येथूनच लढण्यास इच्छुक आहेत.
प्रमोद मानमोडे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून निर्मल समूह उभारला आहे. पिग्मी एजंट म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यानंतर निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बॅंकेची स्थापना केली. आज निर्मलच्या संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये शाखा उभ्या आहेत. त्यास अनेक उद्योग व व्यवसायाची जोड देऊन त्यांनी निर्मल समूह स्थापन केला. या माध्यमातून अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मोफत आरोग्य शिबिर घेऊन ते वैद्यकीय सेवाही पुरवित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com