वैदर्भीयांना संगीत नाटकांची "मेजवानी' महाग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर  : व्यावसायिक नाटकांचा दर्जा सांभाळणे निर्मात्याचे कर्तव्य असते. त्यासाठी अभिनयाच्या भरवशावर पोट भरणारे नट उपयुक्‍त ठरतात. मात्र, त्यांना मुंबईहून नागपुरात आणायचा खर्च सुमारे 46 हजारांच्या घरात येतो. संपूर्ण निर्मिती लाखांच्या घरात जात असल्याने विदर्भातील रंगभूमीपर्यंत मुंबईतील गाजलेली संगीतनाटके पोहोचत नसल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्‍त केली.

मंगळवारी एसजीआर नॉलेज फाउंडेशन आणि चिटणवीस सेंटरच्या वतीने प्रशांत दामले यांच्याशी गप्पागोष्टी व गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांची मुलाखत मृणाल नाईक यांनी घेतली. प्रेक्षकांशी दिलखुलास संवाद साधताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. माझे पहिले प्रेम नाटकच आहे. मी अभिनेता नाही नट आहे आणि तेच मला आवडते, असे दामले म्हणाले.
अभिनेत्याला या क्षेत्रात काम करताना खूप काही शिकता येते. चूक झाली तरी सुधारण्याची संधी राहते. नृत्य येत नसले तरी चित्रपटात संधी मिळाल्याचे प्रशांत दामले यांनी सांगितले. हल्ली मलिकांमधली भाषा अशुद्ध असते. अभिनेत्याला चांगली मराठी भाषा यायला हवीच शिवाय महाराष्ट्रातील मराठी भाषांचे बोली प्रकारही त्यास ज्ञात हवे असल्याचे मत प्रशांत दामले यांनी व्यक्‍त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashant damale news