Maharashtra vidhansabha 2019 : प्रशांत पवार कॉंग्रेसचे "सरप्राईज' उमेदवार?

प्रशांत पवार
प्रशांत पवार

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रशांत पवार यांना तयार केले जात आहे. सोमवारी त्यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत बोलावून याबाबत विचारणा केल्याचे कळते. या वृत्तास पवार यांनीही दुजोरा दिला.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी कॉंग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. येथून मागील निवडणुकीत लढणारे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी लढण्यास नकार दिला आहे. त्यांना पश्‍चिममध्ये उमेदवारी हवी आहे. येथे सरप्राईज उमेदवार राहील असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केले होते. त्यानंतर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह दक्षिण-पश्‍चिम-मधील नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बाहेरचा उमेदवार आम्हाला नको असल्याची तक्रार कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच विदर्भाचे निवडणूक प्रमुख मुकुल वासनिक यांच्याकडे केली होती. त्यांचा रोख पश्‍चिमेतील काही इच्छुक परंतु पक्षात सक्रिय नसलेल्या उमेदवारांकडे होता. कॉंग्रेसच्या अंतर्गत पेचातून प्रशांत पवार यांचे नाव पुढे करण्यात आले असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या वतुर्ळात आहे.
प्रशांत पवार जय जवान जय किसान या संघटनेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी दक्षिण-पश्‍चिमची निर्मिती व्हायच्या आधी पश्‍चिममध्ये बसपकडून तर 2014 मध्ये पश्‍चिम नागपूर मतदारसंघात मनसेकडून निवडणूक लढवली होती. लोकसभेत नाना पटोले यांच्यामुळे ते कॉंग्रेसच्या जवळ आले. आपले कार्यालयच त्यांनी पटोले यांना प्रचारासाठी उपलब्ध करून दिले होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात थेट बोलण्याची हिंमत त्यांच्यात आहे. व्हीएसएचे अनधिकृत बांधकाम असो की मेट्रो रेल्वेच्या उधळपट्टीच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन पवार यांनी भल्याभल्यांना अडचणीत आणले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com